Pune: पुणेकरांनो सावधान; डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले!

Pune Rain Update: डोंगरी परिसरातील पाणी उजव्या व डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे कालवा परिसरातीलही नागरिकांनी काळजी घ्यावी.
Pune Beware Puneers; All five gates of Dimbhe dam opened!
Pune: पुणेकरांनो सावधान; डिंभे धरणाचे पाचही दरवाजे उघडले!sakal
Updated on

Manchar Latest Update: हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) पाण्याने तुडुंब भरले आहे. रविवारी (ता.४) सकाळी साडेअकरा वाजता ९३.४७ टक्के धरण भरले आहे. धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून १५ हजार क्युसेस क्षमतेने पाणी घोड नदीत सोडण्यात आले आहे.

घोड नदी काठावरील शेतकऱ्यांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. असे आवाहन डिंभे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी केले आहे.

Pune Beware Puneers; All five gates of Dimbhe dam opened!
Pune Rain Update : पुणेकरांनो, सतर्क राहा ;आयुक्त भोसले

“गेली आठवडाभर डिंभे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. डिंभे धरण परिसरात आतापर्यंत एकूण ७२६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.अद्याप धरणातून उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडले नाही.परंतु डोंगरी परिसरातील पाणी उजव्या व डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे कालवा परिसरातीलही नागरिकांनी काळजी घ्यावी.

घोड नदीवर डिंभे धरणापासून शिरूर पर्यंत २५ कोल्हापूर पद्धतींचे बंधारे आहेत. डिंभे धरणाचे उपअभियंता दत्ता कोकणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग धरणातील वाढत्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेऊन आहेत. घोड नदीच्या काठावर तसेच कालव्याच्या काठावर लहान मुले, वृद्ध लोक जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.” असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Pune Beware Puneers; All five gates of Dimbhe dam opened!
Pune rain : मुसळधार पाऊस, खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग, प्रशासन अलर्ट मोडवर

“डिंभे धरणातून रविवारी (ता.४) सकाळी नऊ वाजता नऊ हजार क्युसेस, सकाळी साडेदहा वाजता बारा हजार क्युसेस व साडेअकरा वाजता १५ हजार क्युसेसने पाणी सोडले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अजूनही धरणाच्या सांडव्यावरून पाणी घोड नदीत सोडण्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे.”

- प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता डिंभे धरण.

Pune Beware Puneers; All five gates of Dimbhe dam opened!
Pune Flood: राज ठाकरेंची मागणी एकनाथ शिंदेंनी काही तासांतच पूर्ण केली; 'त्या' दोन तरुणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.