डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर सर्व भाषिक काव्यरचना ग्रंथ प्रकाशित होणार; साहित्यिकांना काव्यरचना पाठवण्याचं 'बार्टी'चं आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील भारतासह जागतिक भाषेतील साहित्यकृतीतून जागतिक विक्रम साधण्याचा प्रयत्न बार्टीचा आहे.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkaresakal
Updated on
Summary

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक किर्तीचे व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. आंबेडकरांवर मराठीसह सर्वच भारतीय भाषांमध्ये (Marathi language) विविध साहित्यिक रचना निर्माण करण्यात आल्या आहेत.

भोसरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे (बार्टी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारित भारतीय, तसेच परदेशी भाषेतील विविध काव्य रचना (Poetry) प्रकारातील साहित्य ‘महामानव विश्वकाव्य दर्शन’ पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी साहित्यिकांनी त्यांच्या काव्य रचना पाठविण्याचे आवाहन बार्टीद्वारे करण्यात आले आहे.

या उपक्रमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील भारतासह जागतिक भाषेतील साहित्यकृतीतून जागतिक विक्रम साधण्याचा प्रयत्न बार्टीचा आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक किर्तीचे व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. आंबेडकरांवर मराठीसह सर्वच भारतीय भाषांमध्ये (Marathi language) विविध साहित्यिक रचना निर्माण करण्यात आल्या आहेत.

Dr. Babasaheb Ambedkar
अण्‍णासाहेब पाटील महामंडळाच्या 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; नरेंद्र पाटील संतप्त, मुख्‍यमंत्र्यांना विचारणार जाब

यामध्ये कविता, गझल, अभंग, अखंड, ओवी, छक्कड, शाहिरी, रुबाया, हायकू, चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते आदी रचनांचा समावेश आहे. बार्टीद्वारे नेमक्या याच साहित्यकृती एकत्र करून ते पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले जाणार आहे. महाराष्ट्रात राजभाषा मराठीसह अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. मराठीसह या बोलीभाषेतील वरील प्रकारातील साहित्यकृती एकत्रित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मराठी व्यतिरिक्त विविध राज्याच्या बोलीभाषेतील साहित्यही एकत्र करून त्या सर्वच भारतीयांना ती साहित्यकृती समजावी यासाठी मूळ साहित्यकृती छापून त्याचा हिंदी किंवा इंग्रजीमधील अनुवादही देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे जगभरातील भाषेमध्ये डॉ. आंबेडकरांवरील कविता आणि तत्सम साहित्यही एकत्र करून प्रसिद्ध करण्याचा मनोदय बार्टीने बोलून दाखविला. बार्टीद्वारे या संपूर्ण साहित्यकृतीच्या संपादनाची जबाबदारी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व ज्येष्ठ कवी ज. वि. पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कवींनी आणि साहित्यकारांनी त्यांची काव्य प्रकारातील रचना ९८३३९६१७६३ या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा javipawar@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन ज. वि. पवार यांनी केले आहे.

Dr. Babasaheb Ambedkar
'OBC आरक्षणाबाबत उद्याच कॅबिनेट बैठकीत चर्चा'; सरकारच्या शिष्टमंडळाचं आंदोनकर्त्या लक्ष्मण हाकेंना मोठं आश्वासन

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रासह साहित्यिक क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर पडला आहे. प्रारंभिक काळात महाराष्ट्रातील साहित्यिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या विचाराने प्रेरीत होऊन विविध साहित्याची निर्मिती केली. महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या निर्मितीचा प्रभाव इतर भाषिक राज्यांवरही झालेला आहे. त्यातून विविध भाषा तसेच बोलीभाषेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर यांचे महानत्त्व अधोरेखीत करणाऱ्या साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. अशा काव्य प्रकारातील साहित्यांचे संकलन करून ‘महामानव विश्वकाव्य दर्शन’ हा काव्यसंग्रह बार्टीद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे.

-सुनील वारे, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे.

भारतातील सर्वच राज्यातील आंबेडकरवादी साहित्यिकांशी संपर्क करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, तमीळ, गुजरात, पश्चिम बंगाल आदिंसह इतर राज्यांतील काव्य रचना प्राप्त होत आहेत. प्रत्येक भाषेतील साहित्यासाठी स्वतंत्र पुस्तक असून त्या-त्या भाषेतील साहित्यिकांचे संपादन सहाय्य घेतले जाणार आहे. इंग्लंड, अमेरिकेतील भारतीय साहित्यिकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. तेथूनही साहित्य मिळत आहे.

- ज. वि. पवार, ज्येष्ठ कवी व साहित्यिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.