Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्यानं ९ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
 School Closed
School Closed
Updated on

पुणे : मुंबई आणि पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्यानं ९ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तर सर्व शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (All schools in Mumbai and Pune declared holiday on Tuesday heavy rain warning)

 School Closed
School Closed: सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्यानं विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवारी, ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असं आवाहनही मुंबई महापालिकेनं केलं आहे.

 School Closed
Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील प्रादेशिक हवामान केंद्रानं जिल्ह्यात ९ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहेत.

 School Closed
Pravin Janjal: अकोल्यातील जवान काश्मीरमध्ये शहीद! शासकीय इतमामात साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

अतिवृष्टीमुळं कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसंच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील, असं या आदेशात म्हटलं आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावं, असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.