युद्ध भूमीवर भारतीय लष्कराची क्षमता सिद्ध करण्यासाठी पायदळ सोबत रणगाड्यांची भूमिका शत्रूवर विजय मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण समजली जाते.
पुणे - युद्ध भूमीवर भारतीय लष्कराची क्षमता सिद्ध करण्यासाठी पायदळ सोबत रणगाड्यांची भूमिका शत्रूवर विजय मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण समजली जाते. कोणतेही युद्ध लढताना सादर भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असणे गरजेचे असते. या भागातील नेमकी परिस्थिती, उधबवणाऱ्या समस्या, शत्रुची मारक क्षमता, उपलब्ध सोयी साधनांचा पुरेपूर वापर याबाबत सखोल प्रत्यक्ष कौशल्य मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातील भौगोलिक नकाशाची प्रतिकृती करून आराखड्याची अमलबजावणसाठी नगर येथील अर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूल आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे.
भारतातील भौगोलिक परिस्थिती भिन्न असून एका बाजूला बर्फाळ प्रदेश तर दुसरीकडे वाळवंट. अशा परिस्थितीमध्ये शत्रूवर लक्ष ठेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे समन्वय आवाश्याक असतात. या दृष्टीने प्रत्यक्ष रणगडा युद्ध भूमीवर जाताना दारूगोळा, इंधन आणि राशन या तीन गोष्टी महत्त्वपूर्ण समजल्या जातात. याबाबतची पूर्तता करून अत्याधुनिक सोयी साधनांचा वापर आर्मर्ड कोअर कडून केला जात असल्याची माहिती स्कूल ऑफ आर्मर्ड वॉरफेअरच्या अधिकाऱ्याने दिली.
प्रत्यक्ष युद्ध भूमीचे चित्र तयार करून नकाशा तयार केला जातो. प्रशिक्षणार्थी त्याबाबत चर्चा करून लढाईचा आराखडा तयार करतात आणि या आधुनिक सॉफ्टवेअरवर अपलोड करतात. आवश्यक ते बदल करून अंतिम आराखडा तयार करण्यात येतो. सॉफ्टवेअर आधारित नकाशाच नाही तर वेगवेगळ्या 'सैंड मॉडेल च्या माध्यमातून ही प्रशिक्षण दिले जाते. असे ही या अधिकाऱ्याने नमूद केले.
इलेक्ट्रॉनिक विंग -
युद्ध परिस्थितीमध्ये रणगाड्यांची ओळख पटावी, तसेच शत्रूच्या रणगाड्यावर हल्ला करण्यासाठी सैनिकांना योग्य वेळेत आदेश किंवा माहिती पोचविणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी रण गाड्यावर बसविण्यात आलेल्या रेडिओ सेट या प्रणालीचा वापर केला जातो. रेडिओ सेट प्रणालीद्वारे संपर्क साधणे, माहिती पोहचविण्याच्या या कौशल्याची प्रशिक्षण नगर येथील एसीसीएस मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक विंगद्वारे दिले जाते. यामध्ये जवान व अधिकाऱ्यांसाठी विविध कोर्सेस असून ६५ ते ९० प्रशिक्षणार्थ्याना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. प्रशिक्षणादरम्यान 'रेडिओ टेली कम्युनिकेशन मार्क १' चा वापर केला जातो. तर अशा प्रकारच्या टेली कम्युनिकेशन करताना गती, आवाज, पिच आणि समन्वय हे महत्त्वाचे घटक ठरतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.