Pune : आंबेगाव परिसरात जलवाहिन्या विकसन कामाचा शुभारंभ; एक तपानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी

महाविकास आघाडी सरकार असतानाच आम्ही आपल्या भागासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यास यशस्वी
ambegaon area water supply work on sharad pawar birthday pune marathi news
ambegaon area water supply work on sharad pawar birthday pune marathi newssakal
Updated on

आंबेगाव : दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आणि नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या आंबेगाव खुर्द,आंबेगाव बुद्रुक परिसरात जलवाहिन्या विकसन कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून करण्यात आला.

आंबेगावातील गायमुख ते तुकारामनगर परिसर,आंबेगाव खुर्द येथील मेघस्पर्श सोसायटी,व्यंकटेश नविता सोसायटीसह आसपासच्या भागातील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.येथील रहिवासी सातत्याने पाण्यासाठी पाठपुरावा करत होते.

याची दखल घेत माजी नगरसेविका स्मिता कोंढरे आणि जनहित विकास मंचचे अध्यक्ष सुधीर कोंढरे यांच्या प्रयत्नातून लेक विस्टा परिसरात ४५ लाख लीटर साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम करण्यात आले आहे.

तत्पूर्वी पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाअंतर्गत आंबेगाव खुर्दची जिल्हा परिषद शाळा ते तुकारामनगर आदी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात करण्यात आला.यामध्यामातून परिसरात एक तपाहून अधिक काळ असलेल्या पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

महाविकास आघाडी सरकार असतानाच आम्ही आपल्या भागासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यास यशस्वी झालो आहेत याचे समाधान आहे.

ambegaon area water supply work on sharad pawar birthday pune marathi news
Pune Sinhagad Road Accident : सिंहगड रस्त्यावर भरधाव डंपरने कारला चिरडले; लहान बाळासह 3 जखमी

महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर रखडलेल्या योजनांचा शुभारंभ झाला आणि हक्काचे पाणी मिळेल.त्यामुळे केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले असे म्हणता येईल.या सगळ्या पाठपुरव्यात

खासदार सुप्रिया सुळे यांनीही या मागणीसाठी ताकद दिल्याची माहिती माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी 'सकाळ'ला दिली.यावेळी रविंद्र बेलदरे,बाजीराव बेलदरे, मच्छिंद्र बेलदरे,जनहित विकास मंचचे अध्यक्ष सुधीर कोंढरे, माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.