घोडेगाव - आंबेगाव विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्या समवेत राज्यमंत्री माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पूर्व वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, अरुण गीरे, किरण ताई वळसे पाटील, सुभाष मोरमारे उपस्थित होते.