Pune News : आंबेगाव तालुक्यातील पुर्वभागातील गावांना जोडणाऱ्या अवसरीफाटा ते पारगाव रस्त्याचे होणार रुंदीकरण

आंबेगाव तालुक्यातील पुर्वभागातील गावांना जोडणाऱ्या अवसरीफाटा (मंचर) ते पारगाव रस्त्याचे रुंदीकरण होणार असुन आताच्या रस्त्यापेक्षा दुप्पट रुंद म्हणजे सात मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. प्राथमिक सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
ambegaon awasari phata to pargaon road development survey pmc
ambegaon awasari phata to pargaon road development survey pmcSakal
Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्यातील पुर्वभागातील गावांना जोडणाऱ्या अवसरीफाटा (मंचर) ते पारगाव रस्त्याचे रुंदीकरण होणार असुन आताच्या रस्त्यापेक्षा दुप्पट रुंद म्हणजे सात मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. प्राथमिक सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

पुणे नाशिक महामार्गावरील अवसरी फाटा ते पारगाव पुढे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबुत, टाकळी हाजी, मलठण मार्गे शिक्रापूर येथे पुणे नगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार आहे. सध्या साडेतीन मिटर रुंदीचा रस्ता असुन त्याचे रुंदीकरण करून तो सात मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येणार आहे.

टेक्नोजेन कन्सलटन्सी हि कंपनी प्राथमिक सर्वेक्षण करत आहे या सर्वेक्षणात रस्त्यावर कोणकोणती गावे आहेत. किती नदी, ओढे, नाले आहेत त्यावरील पूल त्यांची रुंदी व उंची तसेच कोणते उपरस्ते आडवे गेले आहे त्यांची रुंदी व जमिनीपासून किती उंचीवर आहेत या बाबींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

अवसरी फाटा ते पारगाव हा रस्ता तालुक्याच्या पुर्वभागातील सुमारे १५ ते १६ गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी घोडेगाव येथे जाण्यासाठी व मंचर येण्यासाठी सोयीचा रस्ता आहे तसेच भीमाशंकर साखर कारखाना याच रस्त्यावर असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर या रस्त्यावरील दळणवळण वाढल्यावर परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मेंगडेवाडी येथील उद्योजक साहेबराव मेंगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.