बेशिस्त चालकांमुळे अपघाताची शक्यता; आंबेगाव खुर्दमध्ये अवजड वाहतूक व्हावी बंद

बेशिस्त चालकांमुळे अपघाताची शक्यता; आंबेगाव खुर्दमध्ये अवजड वाहतूक व्हावी बंद
Updated on

दत्तनगर (Pune): आंबेगाव खुर्द गावठाण मधून होणारी अवजड वाहतूक बंद व्हावी असे निवेदन आंबेगाव खुर्द स्थानिकांच्या वतीने आमदार संजय जगताप यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाणेला दिले आहे. दरम्यान आंबेगाव खुर्द गावठाण मधून स्वामी नारायण मंदीर, नऱ्हे व धायरीकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते आहे. गावठाणातील रस्ते हे मुळातच अरुंद व दाट लोकवस्तीतुन जात असून ते रहदारीचे आहेत. रस्त्यांवर लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचा वावर असतो. सध्या या रस्त्यांवरून पाण्याच्या टँकरची मोठ्या प्रमाणात वाहतूक होताना दिसते आहे. एका दिवसात साधारण चारशे ते पाचशे टँकर हे गावठाणातून रोज ये-जा करत आहेत. त्यामुळे, रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांसह स्थानिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. शिवाय दिवसरात्र चालणाऱ्या या टँकर वाहतुकीने रहिवाशांची झोप उडाली आहे.

बेशिस्त चालकांमुळे अपघाताची शक्यता; आंबेगाव खुर्दमध्ये अवजड वाहतूक व्हावी बंद
सुरक्षा कवचासाठी डाक सेवकांची डॉ. अमोल कोल्हेंकडे धाव

यापूर्वी आंबेगाव खुर्द गावठाण परिसरात अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर, गावठाणातील महावितरणाच्या हेमंत सनविले सबस्टेशन जवळ २०१२-१३ साली ग्रामपंचायतने ठराव करून अवजड वाहन प्रवेश बंदीसाठी कमान लावली होती. त्यामुळे,परिसरातील अवजड वाहतूक बंद झाली होती. परंतु,२०१६-१७ मध्ये ती अज्ञातांकडून पाडण्यात आली. त्यानंतर, पुन्हा गावठाणातून अवजड वाहतुकीस सुरुवात झाली आहे.शिवाय टँकर वाहतुकीने परिसरात वाहतुककोंडीही होते आहे.

बेशिस्त चालकांमुळे अपघाताची शक्यता; आंबेगाव खुर्दमध्ये अवजड वाहतूक व्हावी बंद
पोलिस आले रे! दीप बंगला चौकात अलर्ट देत दारु विक्री

नुकतीच नऱ्हे येथे पाण्याच्या टँकरने एका मुलीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच, त्या घटनेची पुनरावृत्ती आमच्या इथे होऊ नये. बेशिस्त टँकर चालकांच्या हातून एखाद्याचा निष्पाप बळी जाऊ नये. दत्तनगर जांभूळवाडी रस्त्यावर जसे अवजड वाहतुकीला निर्बंध घालून दिलेले आहेत.तसे निर्बंध गावठाणात घालून द्यावेत. किंवा अवजड वाहतुकीला पर्यायी मार्ग देण्यात यावा.अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. या गोष्टीला दुजोरा देत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

'अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.'

- उदय शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.