Pune Rain Update : आंबेगावात मुसळधार पाऊस; घोडनदी व बुब्रा नदीला पुर, जनजीवन विस्कळीत

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भिमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घोडनदी व बुब्रा नदीला पुर आल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
ambegaon rain update ghoda and nubra river flood damage crop agriculture
ambegaon rain update ghoda and nubra river flood damage crop agriculture sakal
Updated on

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भिमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घोडनदी व बुब्रा नदीला पुर आल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. भातशेती तुडुंब भरली असून डिंभे धरणसाठा सकाळी 6 वाजता 49.90 टक्के झाला आहे.

धरणात सध्या उपयुक्त साठा 6.23 टीएमसी झाला आहे. आंबेगाव तालुक्यात सर्व भागात मुसळधार पावसाची गरज होती. काल व आज पावसाने जोरदार सुरूवात करून नवचैतन्य निर्माण केले आहे.

24 तासात जवळ जवळ धरणसाठा 10 टक्केने वाढला आहे. सध्या धरणात 18725 क्युसेक्सने पाऩी येत असल्याने धरण साठ्यात वेगाने वाढ होत आहे. भात पिके तुडुंब भरली आहे. धरण क्षेत्रात आज अखेर 506 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.

घोडेगाव जवळील कोटमदरा पाझर तलाव भरून वहात आहे. नाल्यांना पुर आल्याने पाणी रस्त्यावरून वहात आहे. घोडेगाव परिसरात 90 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गिरवली, चिंचोली, आंबेदरा, साल येथे जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. आंबेदरात भातशेती पाण्याखाली गेली आहे. भात पिकांना पावसाचा फटका बसला आहे. घोडेगाव येथील हरिश्चंद्र मंदिरातील पिंडीला पाणी लागले असून गाभारा पाण्याने भरला आहे.

तालुक्यातील पीक पेरणी पुढीलप्रमाणे -

पिकाचे नाव - सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये) - लागवड क्षेत्र (हेक्टर(

भात - 5138--- 3953

बाजरी - 2776 -1851

मका - 2636 - 2015

कडधान्य - 1358 - 878

मंडलनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे

मंडळ - आज (ता. 25) मिलीमिटर - एकूण पाऊस - टक्केवारी

घोडेगाव - 90.5 - 228 -92.2

आंबेगाव - 253.3 - 1408 - 56.9

कळंब - 50.5 - 112.9 - 45.7

पारगाव - 31.8 - 73 - 29.5

मंचर - 55.5 - 144.9 - 58.6

राज्याचे सहकार मंत्री यांचे प्रशासनाला आदेश

आदिवासी भागात आहूपे खोऱ्यात मुसळधार पावसामुळे आसाणे (कुंभेवाडी) घाटामध्ये दरड कोसळल्याने तीन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,

तहसीलदार संजय नागटिळक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती प्रकाशराव घोलप, संजय गवारी तसेच पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदतकार्य सुरू केले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी नागरिकांनी खबरदारी घ्यावी व आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.