आंबेगावची होतेय बुधवार पेठ; पोलिसांना हप्ते देऊन देहविक्री?

दक्षिण पुण्यातील असणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या नाकावर टिच्चून आंबेगाव ते नवलेपूल दरम्यान खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे.
Ambegaon
AmbegaonSakal
Updated on

आंबेगाव बुद्रुक : कात्रज नवलेपूल बाह्यवळण मार्गावर, आंबेगाव बुद्रुक ते बाबजी पेट्रोल पंप दरम्यान देहविक्री करणाऱ्या महिला सेवा रस्त्यावर राजरोसपणे नियमित उभ्या राहत असल्याने सर्वसामान्य महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांना याचा प्रचंड मनस्ताप होतो आहे. आंबेगावचा परिसर हा झपाट्याने विकसित होत असलेला परिसर असून या परिसरात दाट लोकवस्ती, शाळा, कॉलेज, यांशिवाय परिसरात मोठमोठ्या सदनिका उभारल्या जात आहेत. दरम्यान, दक्षिण पुण्यातील असणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या नाकावर टिच्चून आंबेगाव ते नवलेपूल दरम्यान खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे.

कात्रज नवलेपुल बाह्यवळण मार्गावर असणाऱ्या गणराज हॉटेल जवळ खुले आम वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. तर देहविक्री करणाऱ्या महिलांकडून पोलीस कर्मचारी नियमित हप्ते घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे खुद्द एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने सांगितले.नागरीवस्ती असणाऱ्या या परिसरात वेश्या उघडपणे रस्त्यावर गि-हाईकी करताना दिसत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य महिला व विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत आहे. शिवाय या परिसरातील कारखान्यात काम करणाऱ्या महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

Ambegaon
UP Election 2022: अमित शहांची कानपूरमध्ये प्रचार रॅली

पोलीस आपल्याकडून नियमित हप्ते घेत असल्याचे एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. शिवाय कुणी तक्रार केली,तर मात्र काही दिवस आमचे इथे उभे राहणे बंद होते, काही दिवस जागा बदलावी लागते,त्यानंतर हप्ता वाढवून द्यावा लागतो, असा खळबळजनक आरोपही तिने केला. पोलीस प्रशासनाच्या हप्तेखोर वर्तनाचे या महिलेने सांगितलेले पोलीस पुराण लाजिरवाणे आहे.

आंबेगाव बुद्रुक ते नवलेपूल दरम्यान होत असलेल्या वेश्या व्यवसायाचे अड्डे वाढत असल्याचे दिसून येत आहेत. शिवाय येथे असणाऱ्या लॉज मालकांना चालून गिऱ्हाईक येत असल्याने त्यांचाही यात सहभाग असल्याचे नागरीक सांगत आहेत. तर मार्केटला आणि नोकरीला जाणाऱ्या महिलांनाही काही गिऱ्हाईकांनी विचारणा केल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर योग्य तो उपाय योजिण्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहे.

''आंबेगावचा दर्जेदार असलेला हा परिसर आहे. इथे मोठ्या सोसायट्या आहेत. रिक्षासाठी थांबलेल्या महिलांना इथे गिऱ्हाईक विचारणा करत आल्याचे प्रकार घडले आहेत. येथील सोसायटीतील महिलांनी खासदार सुप्रिया सुळे यांनाही निवेदन दिले आहे. यावर योग्य ती कारवाई करायला हवी.''

-अनिल कोंढरे, माजी उपसरपंच आंबेगाव बुद्रुक.

''या परिसरात पोलिसांकडून नेहमी कारवाया करण्यात येतात. त्याठिकाणी ट्रान्सजेण्डर मोठ्या प्रमाणावर उभे असतात. पोलीस कारवाई करते वेळी ते पळून जातात.पोलिसांकडून कारवाई केली जाते आहे.''

- जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.