Ambegaon : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची (स्टॅम्प) विक्री 110 ते 130 रुपयाला

तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्याचा इशारा
Ambegaon : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची (स्टॅम्प) विक्री 110 ते 130 रुपयाला
Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची( स्टॅम्प )विक्री 110 ते 130 रुपयाला राजरोसपणे केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर 12 मुद्रांक विक्रेत्यांना घोडेगाव येथील सहाय्यक निबंधक (मुद्रांक) एस एस वळवी यांनी नोटिसा बजावल्या आहेत . तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे. सहाय्यक निबंधक यांनी कारवाईचा बडगा उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Ambegaon : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची (स्टॅम्प) विक्री 110 ते 130 रुपयाला
Solapur : महामंडळाच्या योजनेचा अल्पसंख्याक समाजाने लाभ घ्यावा आ.आवताडे

आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये व पाचशे रुपये किमतीची मुद्रांक विक्री परवानाधारक यांची संख्या बारा आहे. शासकीय सुट्टी सोडून दररोज दीड लाख रुपये किमतीच्या मुद्रांकांची विक्री होते. विक्रेत्यांनी मुद्रांककिमती प्रमाणेच मुद्रांकांची विक्री नागरिकांना करावी असा शासकीय नियम आहे. पण गेली काही महिने काही मुद्रांक विक्रेते नागरिकांची अडवणूक करतात जादा पैसे घेतात अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंबेगाव तालुक्याचे सचिव दिनेश बाणखेले यांनी सहाय्यक निबंधक वळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Ambegaon : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची (स्टॅम्प) विक्री 110 ते 130 रुपयाला
Health Blog: त्रिकोणासन;हे आसन सोपे व खूप लाभदायी

मंचर शहरात मुद्रांक खरेदी करत असताना दोन परवानाधारकांकडे त्यांना आलेला अनुभव त्यांनी निवेदनात कथन केला आहे. अनेकदा मुद्रांक शिल्लक असूनही शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. शंभर रुपये किमतीचा मुद्रांक 110 ते 130 रुपये किमतीला विकला जातो. कोणत्याही परिस्थितीत आपले काम करून घ्यायचे या उद्देशाने नागरिकही फारशी खळखळ करत नाहीत. त्याचा फायदा मुद्रांक परवानाधारक घेतात.

Ambegaon : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची (स्टॅम्प) विक्री 110 ते 130 रुपयाला
Ginger Candy Recipe : बदलत्या ऋतूत वारंवार खोकला उद्भवतोय? ही कँडी ठरेल फायद्याची, वाचा रेसिपी

राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या व गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या मुद्रांक व्यावसायिकांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी दिनेश बाणखेले यांनी केली आहे.

Ambegaon : आंबेगाव तालुक्यात शंभर रुपये किमतीच्या मुद्रांकाची (स्टॅम्प) विक्री 110 ते 130 रुपयाला
Travel with Partner : जोडीदारासोबत फिरण्यासाठी ही रोमॅण्टिक ठिकाणे आहेत उत्तम

दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने दखल वळवी यांनी घेतली आहे. त्यांनी 12 मुद्रांक विक्रेत्यांना खुलासा मागणाऱ्या नोटीसा पाठविल्या आहेत. तुमचा मुद्रांक विक्री परवाना रद्द करण्याबाबत जिल्हा सहाय्यक निबंधक यांच्याकडे शिफारस का करण्यात येऊ नये. असे नोटीसीमध्ये नमूद केली आहे. त्यामुळे मुद्रांक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.