मंचर - आंबेगाव तालुक्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक गावातील एकूण नऊ हजार २१२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल व कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार सहा कोटी २४ लाख ५५ हजार ६१२ रुपये नुकसान भरपाईची अनुदान रक्कम शासनाने मंजूर केली होती.