Pune News : आंबेगावातील 98 गावात 'अवकाळी'मुळे 4 कोटींचे नुकसान - संजय नागटिळक

राज्य शासनाकडे अहवाल सादरच तहसीलदार संजय नागटिळक यांची माहिती
ambegaon unseasonal rain hit 98 village farmers 4 cr loss tehsildar sanjay nagtilak pune
ambegaon unseasonal rain hit 98 village farmers 4 cr loss tehsildar sanjay nagtilak puneesakal
Updated on

Manchar News :आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ९८ गावातील नऊ हजार ३९५ शेतकऱ्यांचे तीन हजार १६० हेक्टर ५१ गुंठे क्षेत्रातील जिराईत, बागायत व फळ पिकांचे चार कोटी सात लाख ७९ हजार ४२५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांना बसला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखयांच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे” अशी माहिती आंबेगाव तालुक्याचेतहासिलदार संजय नागटिळक व तालुका कृषी अधिकारी नरेंद्रकुमार वेताळ यांनी दिली.

ते म्हणाले" राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (ता.२७ नोव्हेंबर) सातगाव पठार भागात झालेल्या गारपीटीची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून पंचनामे करण्याविषयी सूचित केले होते.

ambegaon unseasonal rain hit 98 village farmers 4 cr loss tehsildar sanjay nagtilak pune
Pune News : चाकणला एका अनधिकृत बांधकामाला नोटीस; मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची माहिती

त्यानुसार प्रशासनाने तातडीने पंचनामे केले आहेत. सदर अहवाल जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

पिकनिहाय अनुदान

शासन निर्णय मार्च २०२३ च्या निकषानुसार कमाल दोन हेक्टर क्षेत्रातील जिरायती पिकांना हेक्टरी आठ हजार ५०० रुपये, बागायत भाजीपाला पिकांना १७ हजार रुपये, बागायत फळपिकांना २२ हजार ५०० रुपये अनुदान मिळणार आहे.

३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेली पिके व क्षेत्र

हरभरा -२८.८२ हेक्टर, गहू -२३.८० हेक्टर, गहू -२३.८० हेक्टर,कांदा ४८९.७९ हेक्टर,बटाटा १९६.६२ हेक्टर, टोमँटो २.२८ हेक्टर,मका ४८.१६ हेक्टर, भाजीपाला ४०३.३० हेक्टर, चारा पिके १८२.७१ हेक्टर, इतर पिके २१६.४६ हेक्टर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.