Pune News : आंबेठाणमध्ये पाण्याच्या टाकीवर चढलेल्या तरुणाने मारली उडी,गंभीर जखमी

आंबेठाण येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर मनोरुग्ण तरुण काल (दि.२५ ) पासून पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता.
ambethan area youth jump out from water tank badly injured pune police hospital
ambethan area youth jump out from water tank badly injured pune police hospitalSakal
Updated on

आंबेठाण : काल पासून आंबेठाण (ता.खेड) येथे पाण्याच्या टाकीवर चढून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाने अखेर खाली उडी मारली असून यात तो जखमी झाला आहे. आंबेठाण येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर मनोरुग्ण तरुण विनोद विजय गुळवे याने काल (दि.२५ ) पासून पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता.

त्याला पहिल्या दिवशी (दि.२५ ) रेस्क्यू टीम व महाळुंगे पोलिसांनी शिताफीने खाली उतरवले होते. पण आज ( दि.२६ ) पुन्हा हा तरुण सकाळी ११ वाजल्यापासून टाकीवर चढून उडी मारण्याची भीती दाखवत होता.त्याला वाचविण्यासाठी त्याचे कुटुंब, पोलीस प्रशासन,रेस्क्यू टीम व स्थानिक ग्रामस्थ विनवण्या करत होते.

पण तो कोणत्याही विनवणीला दाद द्यायला तयार नव्हता.शेवटी पोलीस व रेस्क्यू टीमने पाण्याच्या टाकीला जाळी लावून त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.पण त्याने एका रेस्क्यू टीमच्या ताब्यातून सुटून थेट टाकीवरून खाली उडी घेतली.

महाळुंगे पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीमने आज ( दि.२६ ) तब्बल ४ तास अथक प्रयत्न करूनही तरुणाला खाली उतरविण्यात त्यांना यश आले नाही. जखमी तरुणांस उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.