Pune News : आंबिल ओढ्यासह मुठा नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात दोघेजण गेले वाहून

पुणे शहरातील मुठा नदी आणि आंबिल ओढ्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोघेजण वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली.
Akshay Salunkhe
Akshay Salunkhesakal
Updated on

पुणे/बिबवेवाडी - शहरातील मुठा नदी आणि आंबिल ओढ्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोघेजण वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली. बिबवेवाडी परिसरातील लेक टाऊन सोसायटीजवळ अंबिल ओढ्यात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेला. तर नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिराजवळ मुठा नदीपात्रात अन्य एक व्यक्ती वाहून गेली. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

अक्षय संजय साळुंके (वय २६, रा. राजीव गांधी नगर, सेवा मुद्रा चाळ, अप्पर) असे ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अन्य एका व्यक्तीचे (वय ५०) नाव समजू शकले नाही.

मूळचा सांगलीतील अक्षय लेक टाऊन सोसायटीजवळ वॉशिंग सेंटरमध्ये काम करीत होता. आंबिल ओढ्याजवळ पाणी बघण्यासाठी गेला असताना अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेला. अग्निशामक अधिकारी संजय रामटेके आणि जवानांनी ओढ्याच्या पात्रात त्याचा शोध घेतला. गंगाधाम फायर स्टेशनमधील तांडेल मनीष बोंबले आणि जवानांनी पद्मावती पुलावरील जाळीमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अक्षय सापडला नाही.

तर, नारायण पेठेतील अष्टभुजा मंदिराजवळ मुठा नदीपात्रात एक व्यक्ती पोहण्यासाठी उतरली. त्यावेळी पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यामुळे ती व्यक्ती वाहून गेली. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य मोहीम राबविण्यात आली. परंतु शोध लागला नाही, असे विश्रामबागच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.