पुणेः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी ते पुण्यात दाखल झालेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर चारच दिवसांनी अमित शाह पुण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पुण्यात आलेले आहेत. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. सहकार विभागाच्या वतीने एक वेब पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, त्या पोर्टलचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल
महावीर चौक- महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड- लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. ही वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक- अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
वरील वाहतूक बदल हे रविवारी (ता. ६) सकाळी आठ ते दुपारी तीनपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले.
पुणे विमानतळावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे थोड्यावेळापूर्वी आगमन झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.