Sharad Pawar : "राजकारणातला सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार शरद पवार"; पुण्यातून अमित शहांचा पवारांवर निशाणा

Amit Shah On Sharad Pawar in BJP Convention In Pune : पुणे शहरात आज भाजपचं महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
Amit Shah Pune Visit
Amit Shah Pune VisitSakal
Updated on

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. यादरम्यान पुणे शहरात आज भाजपचं महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. खोटे कसे पसरवले जात आहे, सध्या एक नोटीफिकेशन काढलं आहे, तारीख नवीन आहे निर्णय जुनाच आहे. मी देखील चकीत झालो. मी पियुष गोयल यांना फोन केला, त्यांनी सांगितलं हा निर्णय आपला नाही शरद पवार यांचा आहे. दूधाचे पावडर आयात करण्याचं सर्क्युलर ते (शरद पवार) काढून गेले आहेत, पण मोदी सरकारने दहा वर्षात एक किलो देखील दूध पावडर आयात केलं नाही. आणि पुढील पाच वर्षात देखील एक ग्रॅम देखील दुध पावडर आयत केलं जाणार नाही. हे भ्रम पसरवून निवडणूक जिंकू इच्छित आहेत, असेही अमित शहा म्हणाले.

हे भ्रष्टाचारावर बोलत आहेत, भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार भारताच्या राजकारणात कोण असेल तर ते शरद पवार आहेत, याबद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? देशातली कोणत्याही सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला संस्थात्मक पद्धतीने करण्याचे काम कोणी केलं असेल तर ते शरद पवार तुम्ही केलं आहे. मी 'डंके की चोट' पर हे सांगतो. तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. तुमचं खोटं इथं चालणार नाही, घरोघरी जावून या खोट्याबद्दल माहिती द्यायची आहे असेही शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Amit Shah Pune Visit
Prank Gone Wrong : हे अति होतंय... सोशल मीडियावरली 'प्रँक'ची कॉपी करणं भोवलं! ११ वर्षांच्या चिमुरड्याचा रिलने घेतला जीव

जे महाराष्ट्राच्या विकासावर बोलत आहेत, आज मी शरद पवार यांना विचारतो, दहा वर्ष महाराष्ट्रात तुमचे सरकार होते. केंद्रात देखील तुमचे सरकार होते तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? हिशोब द्या? खोट्या आश्वासनाशिवाय काही दिलं नाही. युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला फक्त एक लाख ९१ हजार कोटी मिळाले होते. नरेंद्र मोदींनी दहा वर्षात १० लाख पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. पवार साहेब हिशोबावर विश्वास नसेल तर पुण्यातील कोणताही चौक निवडा आमचे मुरलीधर मोहोळ हिशोब घेऊन उभे राहतील असेही अमित शहा येथे म्हणाले. त्यांनी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसाठी काही केलं नाही. या चार शहरांचा विकास मोदी सरकारने केला असेही शहा म्हणाले.

Amit Shah Pune Visit
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना पंकजांच्या पराभवाच्या अजूनही वेदना; म्हणाले, पाडण्यासाठी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.