Prashant Jagtap : अमित शहा तुम्ही तीन वर्ष कुठल्या गुन्ह्यात तडीपार होते, याचे उत्तर द्यावे

पुण्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका घेतली होती.
Prashant Jagtap and Amit Shah
Prashant Jagtap and Amit Shahsakal
Updated on

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शरद पवार यांना 'भ्रष्टाचाराचे सरगना' म्हणतात, पण याच शहा यांना गुजरातमध्ये तीन वर्षांसाठी तडीपार केल्यानंतर मुंबईने त्यांना आश्रय दिला. ते नेमक्‍या कुठल्या गुन्ह्यात तडीपार होते, हे त्यांनी सांगावे आणि त्यांनी एकही गुन्हा नावावर नसणाऱ्या पवार यांच्यावर केलेली टीका हास्यास्पद आहे,' अशा खरमरीत शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपवर टीका केली.

पुण्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी पवार यांच्यावर जोरदार टीका घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला.

जगताप म्हणाले, 'शहा हे पवार यांना भ्रष्टाचारी टोळीचे सरदार म्हणतात, मग त्यांच्या टोळीतील सर्वच सदस्य भाजपमध्ये आहेत, ते भाजपमध्ये जाताच संत झाले का? शहा यांनी मुरलीधर मोहोळ यांना १०.५ लाख कोटी रुपयांच्या निधीचा लेखाजोखा मांडण्यास सांगितला आहे. त्याप्रमाणे त्यांनी हा पैसा नेमके कुठे खर्च केला, याचाही हिशोब द्यावा.

शहा यांना श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी सर्वच पक्षातील भ्रष्टाचारी, गुन्हेगार लोकांना भाजपमध्ये घेऊन पावन केल्याचे श्रेय जरूर घ्यावे. महाराष्ट्रावर असलेल्या ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे श्रेय घ्यावे, 'धीरज घाटे पोलिस संरक्षणाशिवाय फिरू शकत नाहीत, त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांची पवार यांच्याविषयी बोलण्याची आपली योग्यता आहे का? हे तपासून पहावे, असा टोला जगताप यांनी घाटे यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.