Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हेंची दमदार फटकेबाजी ; कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त दाद

पुणे जिल्ह्यातील खेड चे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीचा शुभविवाह काल थाटामाटात संपन्न झाला. या निमित्ताने खासदार डॉ.अमोल कोल्हे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे यांनी भेट दिली.
Amol Kolhe
Amol Kolhesakal
Updated on

चाकण : पुणे जिल्ह्यातील खेड चे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीचा शुभविवाह काल थाटामाटात संपन्न झाला. या निमित्ताने खासदार डॉ.अमोल कोल्हे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे यांनी भेट दिली. डॉ.अमोल कोल्हे यांनी शुभविवाह प्रसंगी शुभेच्छा देताना, "घड्याळ सुटल म्हणून वेळ जुळेना झाली.

पण वधू, वरांच्या आयुष्यात समाधान,सुखाची तुतारी वाजावी "असे सांगितले.त्यानंतर आमदार दिलीप मोहिते व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते,उपस्थित नागरिक, वऱ्हाडी मंडळी यांच्यात हास्यकल्लोळ उमटला. डॉ. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याला आमदार दिलीप मोहिते यांनी जोरात हसून उत्स्फूर्त दाद दिली.

माजी खासदार आढळराव पाटील यांनीही शुभविवाहा निमित्ताने भेट दिली होती त्यावेळी त्यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त केले. आमदार मोहिते यांचे कौतुक करून मोहिते यांचा उल्लेख" माझे स्नेही" असा केला. आढळराव पाटील आणि आमदार मोहिते हे एकाच पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्याने आता त्यांचा स्नेह वाढणार आहे.आमदार मोहिते व माजी खासदार आढळराव पाटील यांनी दिलखुलास चर्चा केली. माजी आमदार सोनवणे यांनी शुभविवाहानिमित्ताने भेट दिली त्यावेळी त्यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त करताना आमदार मोहिते यांचे कौतुक केले.

Amol Kolhe
Pune News : एकमेकांवर कोयत्याने हल्ला, भररस्त्यात दोघे रक्तबंबाळ; पांडवनगरमधील घटना

माजी आमदार सोनवणे यांनी त्यांच्या भाषणात आमदार मोहिते हे स्पष्ट वक्ते व शब्दाला पक्के आहेत असे सांगितले.त्यामुळे आमदार मोहिते यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांना दिलेला शब्द नक्की ते पूर्ण करतील असेच जणू काही सांगितले. शुभविवाहाचे व्यासपीठ म्हणजे राजकीय टोलेबाजीचे व्यासपीठ ठरले.थोडीफार फटकेबाजी झाली. उपस्थितांनाही हसू आले. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार आढळराव पाटील हे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत तर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत. मोहिते यांच्या पुतणीच्या शुभविवाहा निमित्ताने अनेक नेत्यांनी आवर्जून भेट दिली.

आमदार मोहितेंशी दिलखुलास चर्चा केली.फोटो सेशन झाले. खेड, आंबेगाव, जुन्नर,शिरूर, हवेली,भोसरी, पिंपरी-चिंचवड या भागातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आमदार दिलीप मोहिते यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते,खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड व तालुक्यातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.खेड तालुक्यात आमदार मोहिते यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आमदार मोहिते महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला किती मदत करतात आणि खेड तालुक्यातून किती मताधिक्य देतात याकडे महायुतीच्या नेत्यांचे अधिक लक्ष आहे असे बोलले जाते. माजी खासदार आढळराव पाटील यांनी मोहित्यांशी असलेला स्नेह अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात घड्याळ आणि तुतारी या पक्ष चिन्हांचा उल्लेख करून घड्याळाची वेळ जुळेना झाली असा टोला देऊन नेमके काय सूचित केले आहे. आणि सुखाची तुतारी वाजावी असे बोलून नेमका काय संदेश दिला आहे हा मात्र उपस्थितांना पडलेला प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.