ओतूर : जुन्नर तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल आणि तो आयात उमेदवार नसेल असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. ओतूर ता. जुन्नर येथे बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आय काँग्रेस पक्ष जुन्नर तालुका आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आयोजित जाहीर नागरी सत्काराला उत्तर देताना डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.
खासदार कोल्हे म्हणाले महाविकास आघाडीत प्रत्येक नेत्याना आमदार व्हावसे वाटत आहे. यात काही गैर नाही कारण तुम्ही सर्वानी तुमच्या कर्तृत्वाने ५१ हजार मताचे लीड लोकसभेला भलेभले सोबत नसताना मिळवून दिले आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा मी मनापासून आदर करतो. विधानसभेचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे, उमेदवारच नाही तर जुन्नरचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असणार असून तो आयात उमेदवार नसेल.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र भर प्रचार करण्यासाठी जात असताना जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जुन्नर तालुक्याला एक न्याय व महाराष्ट्र इतरत्र एक न्याय असे करता येणार नाही. त्यामुळे पुर्वीच्या स्नेहा पोटी असेल किंवा अचानक उफाळून आलेल्या प्रेमा पोटी असेल, वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणे असेल, मी कोणाच्या ही भावनाचा अनादर करत नाही.काहीना घरवापसीचे डोहाळे लागले असतील. या सगळ्याच्या वेळी एकदा फक्त साहेबांचा विचार करा एवढिच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे.ज्या माणसाने दोन्ही हात सोडून भरभरून उधळले.त्यांच्या कठीण वेळी तेव्हा तुम्ही हात सोडून जाता,तेव्हा हात सोडल्यावर आता अचानक तुम्हाला प्रेमाचे उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे. जे तालुक्यात करणार आहोत त्याचे उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला महाराष्ट्रात द्यायचे आहे.
जर तालुक्यात मी एखाद्यासाठी पक्षाचे दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचे आहे की तालुक्यात का दार उघडले, त्यामुळे कोणत्याही मोठ्या नेत्याचे दार वाजवताना या गोष्टीचा विचार करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. लोकसभा निवडणुकीत संषर्घाच्या काळात पवार साहेबना साथ द्यायची हे मनाशी ठरवून आठ ते दहा लोकसभा मतदार संघ फिरलो.
तुमचे माझे एकमत आहे याविषयी निर्धास्त रहा जुन्नर विधानसभेचा महाविकास आघाडीचा आयात नसलेलाच उमेदवार असणार असून तोच जुन्नर तालुक्याचा आमदार होणार ही जेव्हढी तुमची जबाबदारी तेव्हढी माझी जबाबदारी आहे हे ठाम पणे सांगतो. माझी सर्वाना विनंती आहे ५१ हजार ३०० चे लिड हे एकट्या अमोल कोल्हेचे नाही. हे आपले महाविकास आघाडीचे लिड आहे. संपुर्ण राज्याचा विचार होत असताना महाविकास आघाडीत जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठावूक नाही.जर जागा कोणत्या पक्षाला जाणार आहे हेच ठावूक नाही तर उमेदवार कसा जाहिर करायचा, आग्रह प्रत्येकाचा आहे आणि तो असणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार तुम्ही निवडूण दिले. संघटनात्मक बांधणी शिवसेनेची आहे.कॉंग्रेस ची वेगळी ताकद आहे.
त्यामुळे ही जागा आपल्याकडे हवी हे वाटणे स्वाभाविक आहे. मी केवळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतो तर वेगळे बोललो असतो.पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे चित्र पहाता तेव्हा फार जबाबदारी सांगतो उमेदवार कोण तर महाविकास आघाडीचाच आयात नसलेलाच उमेदवार असेल कारण आयात उमेदवार करायचा तर तो का करायचा याचे हि कारण हवे ५१ हजार ३०० चे लिड असेल तर गरज काय ,या पध्दतीची एकजूट आपण ठेवली तर लोकसभेच्या निवडणुकी सारखाच विधानसभेला ही हेच लिंड घेवून आपण विजयश्री खेचून आणणर आहोत.याचा मला विश्वास आहे.शिवजन्म भुमिची मान खाली जाऊन देऊ नका कारण विधानसभेची उमेदवारी एका पक्षाला आणि एकाच कोणत्याही कार्यकर्त्याला मिळणार आहे.मात्र महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचे पान दिले जाईल याचा मी तुम्हा सर्वाना शब्द देतो.
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी बुधवारी आंबेगाव तालुक्यात जनता दरबार भरवला होता. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला या बद्दल ते म्हणाले मला वाटले नव्हते येथे सर्व सामान्य लोकांचे एवढे प्रश्न प्रलंबित असतील आणि एवढी गर्दी होईल कारण येथे प्रत्येक रविवारी काहीतरी भरत असल्याचे मी एकले होते. तसेच तेथील मंत्रीमोहोदय असताना सुध्दा एवढ्या मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य नागरीकांना त्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींकडे यावे लागते. (असे मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता डॉ.अमोल कोल्हे यांनी टिका केली.)
यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट,विघ्नहर अध्यक्ष सत्यशील शेरकर,उपाध्यक्ष अशोक घोलप, अनंतराव चौगुले, माऊली खंडागळे, शरद लेंडे, अंकुश आमले, तुषार थोरात, मोहित ढमाले, बाबा परदेशी,दिलीप कोल्हे,गणपत डुंबरे,शरद चौधरी,वल्लभ शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी संभाजी तांबे,दिलीप गुजाळ,वैभव तांबे,सुनिल मेहेर,अनिल मेहेर,सुरेखा वेठेकर,निलम तांबे,कावा गागरे,बाजीराव ढोले हे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.