Amol Kolhe: अमोल कोल्हे यांचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक; सांगितलं महत्त्वाचं कारण
पुणे- छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अमोल कोल्हे यांनी अभिनयातून संन्यास घेण्याचे सुतोवाच केले आहेत. शिरुरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढील पाच वर्ष अभिनयातून ब्रेक घेण्याची तयारी आहे, असं कोल्हे म्हणाले आहेत. जनतेने माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला तर मला शिरुरच्या लोकांना प्राधान्य द्यायचं आहे, असं ते म्हणाले.
मतदारसंघातील अनेक प्रोजेक्ट मार्गी लावायचे आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्रासाठी जास्त वेळ मिळणे शक्य नाही. सध्याच्या पाच वर्षांच्या काळातही मी जास्तवेळ अभिनयासाठी दिला नाही. विरोधक विनाकारण टीका करत असतात. आता पुढील पाच वर्ष मतदारसंघातील, महाराष्ट्रातील विषयांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
काही दिवस नाही तर पाच वर्षांचा हा ब्रेक असेल. यात अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पोहोचवणे याचा असेल. हा अपवाद सोडून मी कुठेही पडद्यावर दिसणार नाही. माझी कमिटमेंट शिरुर मतदारसंघाच्या लोकांशी आहे. त्यांना पूर्ण वेळ देणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्यास माझी काहीच हरकत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक विषय आपण मार्गी लावले आहेत. शिरूर मधील जनतेने अनुभवला आहे की गेल्या पंधरा वर्षांमध्ये एकही प्रकल्प शिरूर मध्ये आलेला नाही पण अवघ्या पाच वर्षात अनेक प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागले आहेत आणि हे प्रत्यक्षात येणं त्याला वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही. मालिका विश्वातून अभिनयाला पाच वर्ष ब्रेक द्यावा लागणार आहे असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं.
अमोल कोल्हे एका माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले की, अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला तरी काही घरकत नाही. शिरुरच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यांना जास्त प्राधान्य द्यायचे आहे. दरम्यान, कोल्हे यांच्या अभिनय क्षेत्रातील कामावरुन अजित पवार आणि आढळराव पाटील यांच्याकडून टीका करण्यात आली होती. ते अभिनय क्षेत्राला जास्त वेळ देतात अशी त्यांच्यावर टीका केली होती. अजित पवार टीका करताना एका सभेत म्हणाले होते की, तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा आहे की नटसम्राट खासदार हवा आहे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.