Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे लिखित ‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या गुरुवारी (ता. ४) होणार आहे.
Amol Kolhe
Amol Kolhesakal
Updated on

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे लिखित ‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या गुरुवारी (ता. ४) होणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. कुमार केतकर, अॅड. असीम सरोदे, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक सम्राट फडणीस आणि ‘सकाळ पुणे आवृत्ती’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. सकाळ प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे.

Amol Kolhe
Pune News : पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या 'इतक्या' जागा रिक्त; प्रशासनाच्या कामकाजावर होतोय परिणाम

डॉ. कोल्हे यांनी संसदेत केलेली भाषणे आणि इतर निवडक भाषणे पुस्तकात संकलित करण्यात आली आहेत. संसदेतील हिंदी भाषणांचा अनुवाद प्रज्ञा पोवळे यांनी केला आहे. राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी, धोरणे ठरविणाऱ्या प्रशासकवर्गासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त डॉ. कोल्हे यांचे विचार ऐकण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ प्रकाशनाच्यावतीने करण्यात आले आहे.

‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ पुस्तकाचे प्रकाशन

  • कधी : गुरुवारी (ता.४)

  • केव्हा : सायंकाळी ५ वाजता

  • कोठे : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता

  • अधिक माहितीसाठी : ८८८८८४९०५०

  • ईमेल : sakalprakashan@esakal.comकधी : गुरुवारी (ता.४)

  • केव्हा : सायंकाळी ५ वाजता

  • कोठे : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता

  • अधिक माहितीसाठी : ८८८८८४९०५०

  • ईमेल : sakalprakashan@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.