Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

क्रिकेट खेळताना अवघड जागी चेंडू लागल्यामुळे शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे हा ११ वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला. तो होतकरू मल्ल होता.
Pune News
Pune News sakal
Updated on

लोहगाव : क्रिकेट खेळताना अवघड जागी चेंडू लागल्यामुळे शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे हा ११ वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला. तो होतकरू मल्ल होता. काळाने त्याच्यावर अशी झडप घातल्याने सतीआई परिसरातील खांदवे कुटुंब शोकसागरात बुडाले.

शंभू सुट्या असल्याने गुरुवारी सायंकाळी जगद्गुरू इंटरनॅशनल शाळेजवळील अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर इतर मुलांबरोबर क्रिकेट खेळत होता. चेंडू लागल्यानंतर तो अचानक पडल्याने इतर मुलांनी आरडाओरड केली. त्याला शंभूला खासगी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

शंभूचे चुलते बंडू खांदवे यांनी स्वतःला सावरत सांगितले की, आमचे ४१ जणांचे संयुक्त कुटुंब आहे. शंभूला पाच आजोबा आहेत. रमणबाग शाळेत तो सहावीत गेला होता. आमच्या कुटुंबातील इतर मुलांपेक्षा हुशार आणि चाणाक्ष असल्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. तो धाडसी सुद्धा होता. त्यामुळे आम्ही त्याला मल्ल म्हणून घडवायचा संकल्प सोडला होता.

दोनच महिन्यांपूर्वी मांजरीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात त्याचे नाव नोंदविले होते. तेथे वस्ताद प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तो मेहनत करीत होता, मात्र हे स्वप्न आता अपूर्णच राहिले आहे.

Pune News
Pune Traffic Jam: चार चाकी गाडीचा अपघात झाल्याने सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

त्याची आई श्रद्धा यांच्या दुःखाला अंत राहिलेला नाही, तर दोन वर्षांनी मोठा भाऊ धक्क्यातून सावरलेला नाही. बंडू हे हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत. शंभूचे वडील प्रगतिशील शेतकरी तसेच व्यावसायिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.