Ajit Pawar : आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवावी,उपमुख्यमंत्री ;सीसीटिव्ही कमांड कंट्रोल रूममधून परिस्थितीचा आढावा

जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सीसीटिव्ही कमांड कंट्रोल रूमला भेट देवून शहरातील पूरबाधित परिसराची माहिती घेतली.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

पुणे : जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सीसीटिव्ही कमांड कंट्रोल रूमला भेट देवून शहरातील पूरबाधित परिसराची माहिती घेतली. पोलिस विभागाने आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी कमांड कंट्रोल रूम, नियंत्रण कक्ष आणि संवाद कक्षातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून शहरातील बाधित ठिकाणची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘रात्री पाऊस झाल्यास पाणी साठवण्यासाठी खडकवासला धरणाचा पाणीसाठा नियंत्रित ठेवावा. मदत व बचाव कार्यास अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शक्यतो धरणातून दिवसा पाण्याचा विसर्ग वाढवावा. धरणातील विसर्ग नियंत्रित करून पूर नियंत्रणाचे प्रयत्न करावेत.’’

पवार यांनी नियंत्रण कक्षामधून सीसीटिव्ही यंत्रणेद्वारे एकता नगर, शिवाजी पूल, चऱ्होली, चाँद तारा चौक आणि इतर ठिकाणांची माहिती घेतली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडूनही त्यांनी दूरध्वनीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेतली. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपाययोजनांची माहिती दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले...

  • बचाव कार्य व मदतीसाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करा

  • पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा

  • नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे

  • सोसायट्यांमधील नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.

  • स्थलांतरित नागरिकांना सुविधा पुरवाव्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com