आणि पवार आले..

sharad pawar
sharad pawar
Updated on

पुणे ः ईडी कार्यालयात आज काय घडणार, यांच्याबाबत दिवसभर उत्सुकता लागली असताना, सायंकाळी अजित पवार यांच्या आमदाराकीच्या राजीनाम्याची बातमी येऊन धडकली. त्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच पक्षाचे नेते शरद पवार पूरग्रस्तांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झाले. तेव्हा पवार काय बोलणार याकडे संपर्ण राज्याचे लक्ष पुण्याकडे लागून राहिले. पत्रकारांनी घेरल्यानंतरही "मी लढवय्या आहे, एकदा हाती तलवार घेतली, तर खाली ठेवणार नाही,' असे सांगत पवार यांनी ऐंशीव्या वर्षीही आपली लढाऊ वृत्ती दाखवून दिली. 

राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचा फोन "नॉटरिचेबल' झाला. राजकीय क्षेत्रात आणि माध्यमांमध्ये त्यावरून चलबिचल सुरू असतानाच शरद पवार पूरग्रस्तांच्या भेटीसाठी पुण्यात आले. सायंकाळी सात वाजता अरणेश्‍वर येथे पत्रकारांशी ते संवाद साधणार असा निरोप आला. तो पर्यंत अजित पवार यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच, त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला. मोदीबाग येथील निवासस्थानी रात्री साडेआठ वाजता शरद पवार पत्रकारांशी बोलणार असे निरोप पत्रकारांना आले आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनी वेळेआधीच मोदीबाग गाठले. मोदीबाग येथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यांनाही पवार काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. वेळेचे पक्के असलेले "साहेब' बरोबर साडेआठला मोदीबागेत दाखल झाले. दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा पत्रकारांसमोर मांडून त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या विषयाला हात घातला. 

पन्नास वर्षाच्या आपल्या राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या या नेत्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताण-तणाव दिसत नव्हता. अगदी मनमोकळेपणाने आणि हसत खेळत त्यांनी सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. आगामी निवडणुका, ईडीची कारवाई, अजित पवारांचा राजीनामा याबरोबरच कौटुंबिक अशा चौफेर प्रश्‍नांना त्यांनी तेवढ्याच मनमोकळेपणे उत्तरे दिली. सातारा लोकसभेच्या जागेबाबतही त्यांनी माहिती दिली. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यावर "यांच्या मनस्थिीतीत आणखी भर टाकण्याची माझी इच्छा नाही,' असा टोमणाही मारला. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना" ज्यांनी एकही निवडणूक लढविली नाही, त्यांच्यावर काय भाष्य करणार. काही गोष्टी या अपघातानेच घडतात,' असा चिमटा त्यांनी काढला. 

अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत का, या गुगलीवर त्यांनी "मग काय तुम्ही निवडणुका लढविता का, 'असे प्रतिप्रश्‍न करून वातावरण काहीसे हलके करण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांकडून येणाऱ्या प्रत्येक चेंडूला त्यांच्याकडून टोलवला जात होता. प्रश्‍न पुन्हा पुन्हा विचारूनही "अजित पवार यांच्याशी माझा संपर्कच झालेला नाही. तो झाला की समजून घेईन,' असेच उत्तर त्यांच्याकडून येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.