- प्रमोल कुसेकर
आंधळगाव - 'ज्या घड्याळाचं कार्यकर्त्यांनी गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केले, त्याच घड्याळाच्या विरोधात काम करण्याची दुर्दैवी वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ही निवडणूक होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत हे सरकार उलथवून टाका असा घणाघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक रोहित पाटील यांनी केला.'
शिरूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची 'युवा कार्यकर्ता आढावा बैठक शुक्रवारी (ता. ५) मांडवगण फराटा येथील माऊली मंदिर येथे झाली.
रोहित पाटील म्हणाले, दिल्लीत राज्याची भूमिका मांडण्यासाठी पवार साहेब हाच योग्य चेहरा आहे. औद्योगिक कंपन्यांमधून तयार होणाऱ्या वस्तूंना ते ठरवतात तो भाव मिळतो, मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही.शेतीबाबत या सरकारचे धोरण चुकीचे आहे. शरद पवारांनी अनेक धरणे बांधली तसेच तरुणांना रोजगार मिळेल यासाठी एमआयडीसी उभ्या केल्या.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारे कारखाने या सरकारने बंद पाडले. छत्रपतींच्या मावळ्यांचे अनेक किस्से सांगितले जातात, मात्र ज्यावेळी निष्ठावंत राहण्याची वेळ येते, त्यावेळी आपण निष्ठावंत का राहत नाही असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारायला हवा. खासदार अमोल कोल्हेनी आपल्या पाच कारकीर्दीत १९ हजार कोटींची विकास कामे मतदार संघात केली. त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही.
जे आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहू शकत नाही ते तुमच्याशी कसे प्रामाणिक राहतील. घोडगंगा कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र हा फक्त अशोक पवारांवर अन्याय नसून हजारो शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे असेही पाटील म्हणाले. यावेळी परिसरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आमदार अशोक पवार, विश्वास ढमढेरे, स्वप्नील ढमढेरे, घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार, विकास लवांडे, संभाजी फराटे, नरेंद्र माने, उमेश साठे, कांतीलाल होळकर, लतिका वराळे, सतीश कोळपे, गणेश फराटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर फराटे यांनी केले आभार खंडेराव फराटे मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.