अंगणवाडीतून थेट ‘झेडपी’ शाळेत; पहिली प्रवेशासाठी खास मोहीम

Anganwadi
Anganwadi
Updated on
Summary

जिल्ह्यातील अंगणवाडी आणि मिनी अंगणवाड्यांमधील सहा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व बालकांना सरसकट जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे.

पुणे- जिल्ह्यातील अंगणवाडी आणि मिनी अंगणवाड्यांमधील सहा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व बालकांना सरसकट जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र असलेल्या बालकांच्या गावनिहाय याद्या तयार करण्याचा आदेश अंगणवाडीसेविकांना दिला आहे. या याद्या जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सोपवून, या याद्यांच्या आधारे पहिलीच्या वर्गात प्रवेश दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पालकांना आता आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशासाठी खासगी शाळांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. शिवाय भरमसाट शैक्षणिक शुल्कही भरावे लागणार नाही. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Anganwadi to ZP school Directly Special campaign for first standard)

गेल्या दशकभरापासून ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे ग्रामीण पालकांचा कल हा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याकडे वाढला होता. परिणामी अशा शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना खासगी शाळांचे दरवाजे झिजवावे लागत असत. शिवाय शैक्षणिक शुल्कापोटी भरमसाट रक्कमही मोजावी लागत असे. यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागे. जिल्हा परिषद शाळांतील प्रवेशामुळे पालकांचे श्रम, पैसा वाचू शकणार आहे.

Anganwadi
काँग्रेसची 'चौकट' मोडली; राहुल गांधींसमोर काय आहे संकट?

भटकंती थांबणार

दरवर्षी १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी १५ ते ३० जून या कालावधीत पटनोंदणी पंधरवडा साजरा करण्यात येत असे. या पंधरवड्यात जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आपापल्या शाळेच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन, प्रवेशपात्र बालकांचा शोध घेत असत. मात्र, जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे आता शिक्षकांना प्रवेशपात्र बालकांच्या शोधासाठी दारोदार फिरावे लागणार नाही.

अंगणवाडीमधील सहा वर्षे वयाच्या बालकांच्या गावनिहाय याद्या जिल्हा परिषद शाळांकडे सोपविल्याने, पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी पात्र असलेल्या बालकांचे शाळा प्रवेश सोपे होणार आहेत. शिवाय पालकांचे प्रवेशासाठीचे श्रम आणि शुल्कापोटी मोजावी लागणार, अमाप रक्कम वाचणार आहे. यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळेल, असं जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे म्हणाले.

Anganwadi
''कितीही संकट येवो, महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणार नाही''

शाळा, अंगणवाडी स्थिती

- जिल्ह्यातील अंगणवाड्या --- ४१४९

- मिनी अंगणवाड्यांची संख्या --- ४७२

- एकूण अंगणवाड्या --- ४६२१

- सहा वर्षे वयाच्या बालकांची संख्या --- सुमारे सव्वा लाख

- जिल्हा परिषद शाळांची संख्या --- ३७१०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()