PSI Success Story : गरीबीवर मात करून कुटुंबाचा गाडा हाकता हाकता पतीच्या पाठिंब्यातून अनिता बनली पोलिस उपनिरीक्षक

पत्नी, सून आणि आई या नात्यांना न्याय देतानाच संघर्षातून अनिता पोलीस अधिकारी बनली
anita ashok hulavale became psi mpsc education police department
anita ashok hulavale became psi mpsc education police department sakal
Updated on

पिरंगुट : माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची त्यामुळे बारावी पास झाल्यावर लगेचच लग्न संसाराचा गाडा बाळाला जन्म त्यातूनच चूल आणि मूल यातच रमलेली अनिता. अनिता तशी खूपच हळवी तरीही बु्दधिमान, जिद्दी, कष्टाळू, प्रामाणिक आणि ध्येयवादी मुलगी नेमके हेच गुण अनिताच्या पतीला भावले आणि त्यांनी अनिताला शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले.

मग अनिताने मात्र मागे वळून पाहिले नाही. पदवी परीक्षेनंतर अनिताने सरकारी अधिकारी बनण्याचे ध्येय ठरवून घेतले. पत्नी, सून आणि आई या नात्यांना न्याय देतानाच संघर्षातून अनिता पोलीस अधिकारी बनली.

ही वास्तव गोष्ट आहे अनिता अशोक हुलावळे यांची. अनिताला लहानपणापासूनच जिद्दी , कष्टाळू , प्रामाणिक होती. कोळवण खोऱ्यातील वाळेण (ता.मुळशी) हे अनिताचे माहेर. आईवडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शिक्षणाचे दरवाजे तिला बंद करावे लागले आणि बारावी नंतर कुटुंबियांनी तिचे लग्न केले.

anita ashok hulavale became psi mpsc education police department
Pune : आम्हाला संसदेत बोलूच दिले जात नाही ! खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली मनातील खदखद

अनिताचे दहावी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कोळवण या शाळेत झाले. पिरंगुटला तिने बारावीचे शिक्षण घेतले. अनिताचे लग्न कोंढावळे येथील अशोक हुलावळे यांच्याशी झाल्यानंतर दीड वर्षात त्यांना मुलगा झाला.

आता आपले शिक्षण थांबणार या मानसिकतेत अनिताने संसाराचा गाडा हाकायला सुरवात केली. पण पती अशोक हुलावळे यांना तिच्यातील शिक्षणाच्या जिद्दीची जाण झाली होती. तिची बौ्दधिक क्षमता लक्षात घेऊन संधी मिळाली दिली तर ती सोने करीन याची जाणीव झाली.

anita ashok hulavale became psi mpsc education police department
Pune Viral News : पुण्याच्या लेकीनं अमेरिकेत उभारली 75 हजार कोटींची कंपनी, सेल्फ-मेड पॉवरफुल महिलांमध्ये समावेश

त्यामुळे मुलगा लहान असतानाही अनिताला शिकायला प्रोत्साहन दिले. घरकाम संभाळून अनिताने मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने पदवी पूर्ण केली. दरम्यान , पती अशोक हुलावळे ह्यांना त्यांच्या बायकोला सरकारी अधिकारी झालेले पाहायचे होते.

त्यामुळे अनितानेही त्यांच्या त्या निर्णयाचा स्वीकार करून २०२० मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तयारी केली. कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षा झालीच नाही. तरीही त्यांनी प्रयत्न आणि धीर न सोडता पुन्हा नव्या जोमाने परीक्षेची तयार चालू केली.

anita ashok hulavale became psi mpsc education police department
Pune : आंबेगाव तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; पीकांच्या चिंतेने शेतकरी हवालदिल

गेल्यावर्षी त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले. अनिताने अशोक हुलावळे यांच्या मार्गदर्शनातून पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व व मुख्य परीक्षा पास केली. शारीरिक परीक्षेसाठीही अशोक हुलावळे यांच्या स्वतःच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून अनिताला मार्गदर्शन केले.

अशोक यांची घोटावाडे फाटा येथे जिम असून ते उत्तम प्रशिक्षक आहेत. त्यांच्या या अनुभवाचा अनिताला मोठा लाभ झाला. अनिताच्या डाएटपासून ते शारीरिक कसरतीपर्यंत अशोक हुलावळे यांनी पूर्णपणे तयारी करून घेतली.

४ जुलै २०२३ रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि अनिता हुलावळे मुलींमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिच्या यशासाठी अनिताने पूर्णपणे संपूर्ण श्रेय पती अशोक हुलावळे यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.