पुणे - ‘अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळायलाच हवा. त्यांना हा सन्मान मिळाल्याने या सन्मानाची प्रतिष्ठा वाढेल,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. ‘हा सन्मान मिळावा, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.