दहावीच्या निकालाबाबत मूल्यमापनाची पद्धत जाहीर

कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावला जाणार आहे. यासाठी मूल्यमापन कार्यपद्धती राज्य सरकारने नुकतीच जाहीर केली.
SSC and HSC Board
SSC and HSC BoardSakal
Updated on

पुणे - कोरोनामुळे (Corona) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (SSC Student Result) अंतर्गत मूल्यमापनाच्या (Evaluation) आधारे लावला जाणार आहे. यासाठी मूल्यमापन कार्यपद्धती राज्य सरकारने (State Government) नुकतीच जाहीर केली. यामध्ये पुनर्परीक्षार्थी, खासगी आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी (Result) ८० आणि २० गुणांचे सूत्र वापरले जाणार आहे. हे सूत्र वापरून निकाल कसा जाहीर होणार, हे आपण समजावून घेणार आहोत. (Announced Method of Evaluation Regarding the Result of SSC)

शाळास्तरावरील निकाल समितीचे कामकाज कसे असेल?

उत्तर : प्रत्येक माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकाच्या अध्यक्षतेखाली त्यांच्यासह सात सदस्यांची निकाल समिती असेल. त्यात विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, भाषा सर्व विषयांच्या शिक्षक सदस्य असतील. सदस्यांपैकी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सेवाज्येष्ठ शिक्षक समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. संबंधित विषय शिक्षक विषयांचा कार्यपद्धतीनुसार निकाल तयार करतील, हा निकाल वर्गशिक्षकाकडे सादर होईल. वर्गशिक्षक, विषय शिक्षक विषयनिहाय गुणांचे संकलन करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या नमुन्याप्रमाणे निकाल समितीकडे सादर करतील. समितीने अंतिम केलेला निकाल विभागीय मंडळाकडे सादर करण्यात येईल.

SSC and HSC Board
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका; काळजी करु नका;पाहा व्हिडिओ

मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लागणार?

: अपवादात्मक परिस्थितीमध्ये शाळेने घेतलेल्या सराव चाचण्या, प्रथम सत्र, सराव परीक्षा आणि अन्य अंतर्गत मूल्यमापनासाठी एखादा विद्यार्थी उपस्थित नसेल, तर अशा विद्यार्थ्यांबाबत शाळांनी ऑनलाइन, दूरध्वनी अशा एकास एक पद्धतीने वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे. त्यानंतर आवश्यक नोंदी करून गुणदान करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशात दिली आहे.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळण्याची सुविधा असेल का?

: नाही. दहावीच्या परीक्षेचा (२०२१) निकाल शाळास्तरावर शाळांकडून होणाऱ्या विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार होणार आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, अन्य मूल्यमापन अशा परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखविल्या, घरी दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे, पुनर्मूल्यांकन अशा सुविधा या परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसतील, असे शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशात स्पष्ट केले आहे.

SSC and HSC Board
पोलिसाने भावासह केली डॉक्‍टरची धुलाई; पुण्यातील धक्कादायक घटना

पुनर्परीक्षार्थींचा निकाल कसा लागणार?

  • राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांची सरासरी - ८० गुण

  • विद्यार्थ्यांचे दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन - २० गुण

खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे ?

  • संपर्क केंद्रातर्फे आयोजित सराव चाचण्या, स्वाध्याय पुस्तिका, प्रकल्प यापैकी एक वा अधिक बाबींतील विषयनिहाय गुणांची सरासरी - ८० गुण

  • मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांस अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण प्रात्यक्षिक परीक्षा - २० गुण

तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी उत्तीर्ण कसे?

  • मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांची सरासरी - ८० गुण

  • विद्यार्थ्यांचे दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन - २० गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.