ईसीएचएस विभागाच्यावतीने वार्षिक पडताळणी प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार

वार्षिक पडताळणी प्रक्रिया नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे
Annual verification process will be implemented by ECHS department
Annual verification process will be implemented by ECHS department
Updated on

पुणे - आरोग्य सेवांचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना (ईसीएचएस) विभागाच्यावतीने आता महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे ईसीएचएसमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. यासाठी वार्षिक पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या नोव्हेंबरपासून याची सुरवात होणार आहे. यामुळे फक्त ईसीएचएस योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाच सेवा सुरू राहणार आहे.

माजी सैनिक, त्यांचे कुटुंब आणि जवानांच्या विधवा यांना ईसीएचएसतर्फे आरोग्यसेवा पुरविण्यात येतात. परंतु यामध्ये माजी सैनिकांच्या अवलंबितांसाठी काही अटी असल्याने त्यानुसार या अवलंबितांना ईसीएचएस सेवा उपलब्ध नाहीत. असे असले तरी अनेकांकडून या अटी पाळल्या जात नसून ईसीएचएस विभागाला योग्य कागदपत्रे न पुरवता आरोग्यसेवांचा लाभ घेतला जात आहे. परिणामी ज्या लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने आरोग्यसेवांची गरज आहे, त्यांना ते मिळत नाही. ही बाब लक्षात येताच आता ईसीएचएस विभागाने अशा अवलंबितांचा सेवांना बंद करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

याबाबत ईसीएचएसच्या सल्लागार समितीचे सदस्य रवींद्र पाठक यांनी सांगितले की, ‘‘ईसीएचएस अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्यसेवा योजनांचा गैर फायदा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये अनेक माजी सैनिकांनी आपल्या अवलंबितांचे योग्य कागदपत्रे सादर केले नाही. ईसीएचएसद्वारे माजी सैनिकाच्या मुलाला नोकरी असेल किंवा मुलीचे लग्न झाले आहे, अशी मुले ईसीएचएसचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत. परंतु बऱ्याचदा लग्न झालेला किंवा नोकरीचे प्रमाणपत्र ईसीएचएस विभागाकडे सादर न करता आरोग्य सेवांचा लाभ घेतला जात आहे.

नुकताच असा एक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे वार्षिक पडताळणी प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. माजी सैनिक व त्यांच्या पत्नी यांना कायमस्वरूपी या योजनांचा लाभ मिळत त्यामुळे ही प्रक्रिया त्यांच्यासाठी नसून त्यांच्या अवलंबितांसाठी (मुलगा, मुलगी, आई-वडील) असेल.

गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या अनेक लाभार्थ्यांना ६४ केबी ईसीएचएस कार्ड देण्यात आले आहे. त्यामुळे प्रक्रिये अंतर्गत माजी सैनिकांनी त्यांच्या अवलंबीतांची माहिती येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करता येईल. प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती तसेच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी echs.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन ईसीएचएस विभागाद्वारे करण्यात आले आहे.

या प्रक्रियेमुळे काय होणार ?

  • वार्षिक पडताळणी प्रक्रियेमुळे ईसीएचएस विभागाकडे लाभार्थ्यांच्या योग्य माहितीची नोंद

  • केवळ पात्र असलेल्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

  • वेळेत वार्षिक पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केलेल्यांचे ईसीएचएस कार्ड ब्लॉक होणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()