मुळशीत आणखी एकाला कोरोना, 33 जण क्वारंटाइन  

corona
corona
Updated on

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील चाले गावाच्या खैरेवाडी येथे 47 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. 

संबंधित रुग्णावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मागील दोन दिवसांपासून ताप व खोकल्याने तो आजारी होता. संबंधित व्यक्ती हिंजवडी येथे एका कंपनीत काम करीत असून, तेथील एकविस जणांना व रुग्णाच्या घरातील सहा जणांना क्वारंटान करण्यात आलेले आहे. रुग्णाने उपचार घेतलेल्या खासगी रुग्णालयातील दोन डॉक्टर व चार कर्मचारी यांनाही क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. 

रुग्ण राहात असलेला भाग सील करण्यात आले असून, तेथे मायक्रोकंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोळवण खोऱ्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे, असे आवाहन मुळशी तालुका आरोग्य अधीकारी अजित करंजकर यांनी केले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()