पुणे झेडपीच्या सभापतींना कोरोनाची लागण; सभापतींची पूर्ण फॅमिलीच 'होम क्वॉरंटाइन!'

ZP-Pune
ZP-Pune
Updated on

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या एका सभापतींच्या दालनात शुक्रवारी (ता.२४) कोरोनाने ऐंट्री केली आहे. एका विषय समितीच्या सभापतींची कोरोना टेस्ट शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आली आहे. 

यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या एका सदस्यापाठोपाठ आता एक सभापतीही कोरोना बाधित आढळून आले आहेत. सभापती हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिला रुग्ण आढळून आलेल्या आणि सातत्याने पुणे शहराशी संबंधित असलेल्या तालुक्यातील आहेत.

दरम्यान, यापूर्वी कोरोनाबाधित झालेले जिल्हा परिषद सदस्य हे दुर्गम तालुक्यातील असून, कोरोनाचा ग्रामीण भागातील सर्वाधिक उद्रेक पहिल्यांदा याच तालुक्यात झाला होता. 

कोरोनाबाधित आढळून आलेल्या सभापतींच्या कुटुंबातील त्यांच्यासह सहा सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्या तरी, लक्षणे जाणवत नसल्याने या सर्वांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.