पुणे : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मेट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता १ ली ते १० वी), बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी व १० वी) या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी
www.scholarships.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
तसेच नूतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.scholarships.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.