Pune News : रस्त्याच्या कामात पीएमआरडीएची मनमानी, दुभाजकाऐवजी बसविले पेव्हिंग ब्लॉक

या रस्त्याचे काम साडेचार वर्षांपूर्वी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
Pune News
Pune Newsesakal
Updated on

मांजरी : पीएमआरडीएकडून मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाण पूल ते मुळामुठा नदी पर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. गेली साडेचार वर्षांपासून हे काम रडतखडत सुरू आहे. मात्र, आगोदरच निकृष्ठ दर्जाचे आणि अशास्त्रीय पध्दतीने होत असलेल्या या कामात आता दुभाजकाऐवजी पेव्हिंग ब्लॉक बसवून अधिकारी व ठेकेदारानेही आपल्या मनमानीची भर टाकली आहे.

Pune News
Dhule Crime News : मंगलपोत चोर दादाभाईला ‘एलसीबी’ पथकाकडून बेड्या; पांझरा नदीपात्रात पळाल्यानंतर पोलिस शिकंज्यात

या रस्त्याचे काम साडेचार वर्षांपूर्वी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. सुमारे २० कोटी १६ लाख रूपयांच्या निधीतून हे पावणे दोन किलोमीटरचे काम होत आहे. मात्र, या कामाला सुरूवातीपासूनच गती नाही. भूसंपादन, अतिक्रमण, विद्युत डीपी, खांब, वाहिन्यांचे स्थलांतर यासाठी जात असलेला वेळ, ठेकेदाराकडून वारंवार कामात पडणारा मोठा खंड, निकृष्ठ दर्जामुळे वारंवार येणारी दुबार कामाची वेळ, अधिकारी ठेकेदार यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि करण्यात येणारी दिशाभूल, असा सावळा गोंधळ या रस्त्याच्या कामात दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होईल, याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

Pune News
Jalgaon News : रेल्वेच्या गलथान कारभाराने केळी उत्पादकांना लाखोचा फटका

केवळ पावणे दोन किलोमीटर अंतरातील हे काम आजही धिम्या गतीने आणि अडखळत सुरू आहे. त्यातच आता हे काम मनमानी पद्धतीने सुरू आहे. रस्त्याला दुभाजक आवश्यक असतानाही दुभाजक न टाकता व काही भागातील दुभाजक काढून त्याठिकाणी केवळ पेव्हिंग ब्लॉक बसवून ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. अनेक ठिकाणी पदपथही अरूंद केले आहेत. अशा निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे भविष्यात वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. स्ट्रीट लाईटचे खांब बसवण्यास अडचण निर्माण होणार आहे, असा आरोप प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Pune News
Mumbai Local News: रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

"पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन रस्त्याची पाहणी करावी. मूळ आराखड्यानुसार अपेक्षित काम करून घ्यावे. सध्या रस्त्याचे काम अतिशय विस्कळीतपणे होत असल्याचे दिसून येत आहे. हे काम योग्य पध्दतीने लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन केले जाईल.'

- बाळासाहेब घुले, शासन नियुक्त सदस्य पुणे मनपा विकास समिती

"विद्युत वाहिन्या व ट्रान्सफार्मर स्थलांतर तसेच अतिक्रमणांचे अडथळे हटविण्यासाठी लागलेल्या कालावधीमुळे रस्त्याच्या कामाला विलंब झाला आहे. आजूनही साठ-सत्तर मीटरचे अतिक्रमण काढायचे आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार ठिकठिकाणी पंक्चर ठेवले आहेत. शंभर मीटर अंतरातील पेव्हिंग ब्लॉकचे काम बाकी आहे. के. के. घुले विद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने रस्त्यामध्ये दुभाजक न टाकता पेव्हिंग ब्लॉक बसवून रस्ता पूर्ण करण्यात येत आहे. नागरिकांची दुभाजक बसवण्याचीच मागणी असेल तर दुभाजक बसवण्यात येतील.'

- विजय कांडगावे ,अभियंता, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.