शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत मनोरमा खेडकरांना नोटीस; दहा दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास होणार कारवाई

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशीम येथे नुकतीच बदली करण्यात आली.
Manorama Khedkar
Manorama Khedkaresakal
Updated on
Summary

मनोरमा खेडकर यांनी धडवली (ता. मुळशी) येथील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली.

पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा यांच्याविरुध्द पौड पोलिसांनी (Poud Police) गुन्हा दाखल केला होता.

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशीम येथे नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबाबतच्या कागदपत्रांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडकर यांच्यावर २६ हजार रुपयांचा थकीत दंड असल्याचे समोर आले. खेडकर यांनी खासगी मोटारीवर लाल दिवा लावल्याचे उघडकीस आल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

दरम्यान, मनोरमा खेडकर यांनी धडवली (ता. मुळशी) येथील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. या प्रकरणी मनोरमा, त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्यासह सातजणांविरुद्ध पुणे ग्रामीणच्या पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘तुमचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे.

या कृत्यामुळे कुटुंबीय आणि समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. शस्त्र परवान्यात दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात का येऊ नये? याबाबत दहा दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, ’असे नोटिशीत म्हटले आहे. ही नोटीस खेडकर यांच्या बाणेर येथील नॅशनल सोसायटीतील बंगल्याच्या प्रवेशद्वारावर चिकटविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.