जंक्शनमध्ये विद्यार्थ्यांसाठी गोड जेवणाची व्यवस्था

जंक्शनमध्ये विद्यार्थ्यांसाठी गोड जेवणाची व्यवस्था

Published on

वालचंदनगर, ता. १५ : जंक्शन (ता. इंदापूर) येथील शाळेमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रामस्थ व शिक्षक स्वागतासाठी थांबले होते. पहिलीच्या २६ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके वह्या पेन व शालेय साहित्य देण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये गोड जेवणाचे व्यवस्था केली होती. स्वागतासाठी जंक्शनचे माजी सरपंच राजकुमार भोसले, शिव कल्याण राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामेश्वर माने, अक्षय भोसले, सदाशिव अवघडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद वाडकर, उपाध्यक्ष सचिन घाडगे, मुख्याध्यापक सुनील भोसले, लालचंद खोमणे, शरयू कुमठेकर, विजया जाधव, रत्नमाला मेहेर उपस्थित होते.

जंक्शनमधील शिवकल्याण राजा प्रतिष्ठानतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामेश्वर माने यांनी एक लाख ७५ हजार रुपयांच्या चार एलईडी स्क्रीन मोफत देण्यात आल्या. तसेच शाळेतील शिक्षकांनी पाच हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दिले.
------
04310

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.