अट्टहासाचे करूयात ‘विसर्जन’

Old-People
Old-People
Updated on

साठी हे तसं मृत्यू होण्याचं मुळीच वय नाही. पण आपण दिवसभर निष्काळजीपणे फिरून घरातील ज्येष्ठांना कोरोनाची भेट देत आहोत. माझ्यापर्यंत कोरोना पोचणारच नाही, असे वाटत असणाऱ्या कित्येक कुटुंबातील ज्येष्ठ त्यांच्यासमोर कोरोनाचे बळी ठरले आहेत. हे रोखणे निश्‍चितच आपल्या हातात आहे. मनाई असतानाही अट्टहासाने गणपतीच्या दर्शनाला जायचे आणि संसर्ग वाढवायचा की, पुढच्यावर्षी मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करायचा याचा निर्णय घ्यावाच लागेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील एका शासकीय संस्थेत स्वरूप काम करतो. तेथे सहकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतरही तो बाधित व्यक्तींच्या संपर्कात राहिला. आपल्याला काही होऊ शकत नाही, हा इतर तरुणांमध्ये असणारा भ्रम त्याच्याही डोक्‍यात होता. पण पुढच्या आठवड्यात त्याच्या ५८ वर्षीय आईला कोरोनाची बाधा झाली. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

आज स्वतः स्वरूप ॲडमिट आहे, वडिलांची प्रकृतीही गंभीर आहे. हे एका कुटुंबातील प्रातिनिधिक उदाहरण. तुमच्या आसपास, कुटुंबात अशी अनेक उदाहरणे आहेत. पण बळी जाणाऱ्यांपेक्षाही संसर्ग पसरविणाऱ्यांमध्ये ते गांभीर्य आलेले नाही. याचमुळे पुण्यातील कोरोनाची साखळी तुटत नाही.

पुण्यात मृत्यूचा आकडा २१६८ वर पोचला आहे. महिनाभरापासून सरासरी सुमारे साडेचौदा हजार नागरिक उपचार घेत आहेत. यातील सुमारे अडीच हजार रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. खासगी रुग्णालयांची बिले पाहिली तर अनेकांच्या आयुष्याची पुंजी त्यावर खर्च झाली तरी शेवटी मृत्यूच हाती लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मृतांमध्ये ८० टक्‍क्‍यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. संसर्ग होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये सर्वाधिक आहेत. प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ते बरेही होत आहेत. पण कोरोनाचे वाहक म्हणून ते ज्येष्ठांना बाधा करीत आहेत. त्यामुळेच निष्पाप ज्येष्ठांचा बळी जात आहे. यात निश्‍चितच सुधारणा होऊ शकते. त्यामुळे आता निर्णय आपल्या 
हातात आहे.

काय करावे?

  • तरुणांनी ज्येष्ठांना बाधा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • जे रुग्ण आहेत, त्यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर राहा
  • कार्यालयात, खरेदीसाठी बाहेर जाताना, सिग्नलला उभे असताना अंतरापासून सर्व नियम पाळा

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()