Artificial Intelligence : वाणिज्यच्या पदवी अभ्यासक्रमात ‘एआय’

उत्तम संभाषण कौशल्य, टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, इंटरनेट बॅंकिंगपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचे (एआय) विषय आता वाणिज्य शाखेतील पदवी (बी.कॉम) अभ्यासक्रमातच शिकविण्यात येणार आहेत.
Artificial Intelligence
Artificial Intelligencesakal
Updated on

पुणे - उत्तम संभाषण कौशल्य, टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, इंटरनेट बॅंकिंगपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचे (एआय) विषय आता वाणिज्य शाखेतील पदवी (बी.कॉम) अभ्यासक्रमातच शिकविण्यात येणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) चार वर्षांची पदवी आता अधिक कौशल्याभिमुख करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांत एनईपीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने बी.कॉम.च्या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला ‘बी.कॉम.ऑनर्स’ असे नाव देण्यात आले असून, कौशल्याभिमूख प्रात्यक्षिकांवर यात भर देण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने बी.कॉम.च्या चारही वर्षात शिकविल्या जाणाऱ्या अशा विषयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. उद्योग आणि आस्थापनांच्या गरजा ओळखून अभ्यासक्रमात हे बदल करण्यात आले.

दिवसाला एका तासाचे प्रशिक्षण

एका सत्राला ६० तासांचे व्यावसायिक प्रशिक्षण असणार आहे. म्हणजे रोज एक तास विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी ३० विद्यार्थ्यांची एक बॅच तयार करण्याचा प्रस्ताव आहे. प्राध्यापकांचे कौशल्य अद्ययावत करण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने प्रशिक्षण घेण्यात येत असून, दहा वरिष्ठ प्राध्यापकांची एनईपी कौन्सिलर म्हणून नियुक्ती केली आहे. महाविद्यालयाच्या गरजेनुसार त्यांना एनईपीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

‘या’ विषयांचा समावेश

  • टॅली ईआरपी, ॲडव्हान्स एक्सेल, गुगल टूल फॉर बिझनेस

  • डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, एम-कॉमर्स

  • कृत्रिम बुद्धिमत्ता, बेसिक्स फॉर मशिन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी फॉर बॅंकींग

  • ई-ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, बिहेविरअल इकॉनॉमिक्स

  • गुगल अनॅलॅटिक्स, ॲडव्हान्स टूल्स फॉर मॉडर्न बिझनेस मॅनेजमेंट

  • ई-सीआरएम, ई-लॉ, इन्ट्रॉडक्शन टू. आर ॲण्ड पायथॉन, सायबर सिक्युरिटी, फॉरेन्सिक अकाउंटिंग एक्स्पर्ट

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • श्रेयांक पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाणार, सर्व विद्यापीठांचे विषयांचे श्रेयांक एकसमान.

  • चार वर्षाचा ऑनर्स किंवा पारंपरिक बी.कॉम. पदवीचाही पर्याय.

  • विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य.

  • कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडला, तरी मिळालेल्या श्रेयांकानूसार प्रमाणपत्र मिळणार.

  • मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिटममुळे नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदा.

  • मायनर विषयात विद्यार्थ्यांना इतर विद्याशाखेतील विषयही शिकता येतील.

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना रोज एक तास कौशल्याभिमुख प्रात्यक्षिके करावी लागतील. नव्या विषयांसाठी प्राध्यापकांचेही प्रशिक्षण घेण्यात आले असून, महाविद्यालय स्तरावरील सुविधांचीही कल्पना देण्यात आली आहे. एनईपीनूसार अभ्यासक्रम अधिकाधिक रोजगाराभिमुख करण्यावर भर असणार आहे.

- डॉ. यशोधन मिठारे, अधिष्ठाता (प्रभारी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.