पुणे : ना खासगी शिकवणी, ना अभ्यासाचं टेंशन. १०वीचा अभ्यास आहे म्हणून तिने गायन, कथ्थक नृत्य शिकणे सोडून दिले नव्हते. तरीही तिने १०वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत तडाखेबंद शतक मारले आहे. हे यश आहे महाराष्ट्रीय मंडळाच्या आर्या कोशे हिचे.
आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. अभ्यासा व्यतरिक्त विविध गोष्टी सुरू असताना तिने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवले हे विशेष आहे. 'सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये १०० टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. या स्वप्नपूर्तीसाठी मी १०वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले.
माझी आई ११वी, १२वी आणि इंजिनियरींगचे क्लास घेते, त्यामुळे माझ्या १०वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले. ती जसा सांगेल तसा अभ्यास मी करत गेले. माझ्या यशामध्ये आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला. कार्डियाक सर्जन होणं हे माझं स्वप्न आहे, त्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.