किरण गोसावीला आठवेना फेसबुक व ई-मेलचा पासवर्ड

फरार कालावधीत त्याने सचिन पाटील नावाने बनावट आधारकार्ड बनवून घेतले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
kiran gosavi
kiran gosavisakal media
Updated on

पुणे : क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणात पंच असलेला व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या किरण गोसावी याला त्याच्या फेसबुक व ई-मेलचा पासवर्ड आठवत नसल्याने तो परत मिळवण्यासाठी 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी, पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. फरार कालावधीत त्याने सचिन पाटील नावाने बनावट आधारकार्ड बनवून घेतले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच किरण गोसावीकडून रुपये 1 लाख जप्त केले आहेत.

kiran gosavi
कोरोनानंतर आरएसव्ही व्हायरसची भीती, काय आहेत 'या' आजाराची लक्षण

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गोसावी याने फरार असताना कुसुम गायकवाड हिच्याकडून सचिन पाटील नावाचे बनावट आधारकार्ड बनवून घेतले. याबाबत गोसावी आणि गायकवाड यांच्याकडे एकत्रितपणे तपास करायचा आहे. आरोपीचे फेसबुक आणि ई-मेलचा आयडीवरून गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्‍यक असलेली माहिती जमा करायची आहे. तर गोसावी याने फिर्यादी यांची एकूण तीन लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यातील एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्याची मागणी सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.के.बाफना-भळगट यांनी ती मान्य करत गोसावी याच्या कोठडीत एक दिवसांची वाढ केली आहे.

kiran gosavi
"राज्य सरकारने समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी थांबावे"

गोसावी याने मेट्रोपोल हॉटेल मलेशिया येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी तीन लाख नऊ हजार ३९५ रुपये घेत फसवणूक केली आहे. या प्रकरणी चिन्मय श्रीधर देशमुख (वय २२, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात शेरबानो महम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. मुंबई) हिला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. सचिन कुंभार यांनी काम पाहिले. तांत्रिक बाबींचा तपास करण्यासाठी पोलिस सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन तपास करू शकतात. तसेच पोलिस कोठडीसाठी कोणतीही सक्षम कारणे पोलिसांकडे नाहीत, असा युक्तिवाद ॲड. कुंभार यांनी केला.

kiran gosavi
महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव

चार पेनड्राईव्ह व दोन मेमरी कार्ड न्यायालयात सादर :

गोसावी याचा रेडमी कंपनीचा फोन आणि फिर्यादी यांच्या वडिलांचा फोन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. गोसावी याच्या मोबाईलमधील सर्व डेटा, आवाजाचे नमुने, फिर्यादी यांनी गोसावी याला पाठवलेल्या व्हाईस नोट व संभाषणासह विविध डेटा असलेले चार पेनड्राईव्ह व दोन मेमरी कार्ड पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()