Baramati : तब्बल 315 कॅमेरे ठेवणार बारामतीवर चोवीस तास नजर

बारामतीची कायदा आणि सुव्यवस्था या प्रकल्पानंतर अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
cctv watch
cctv watchsakal
Updated on

बारामती : आचारसंहितेनंतर बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमे-याचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाची निविदा आचारसंहितेनंतर निघणार आहे. बारामतीची कायदा आणि सुव्यवस्था या प्रकल्पानंतर अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

cctv watch
Nashik News : उत्कृष्ट चवीमुळे ‘3102’ उसाला अधिक मागणी; रसवंतीचालकांकडून प्राधान्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरवातीचा मर्यादीत असलेला हा प्रकल्प व्यापक करण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास 28 कोटी रुपये खर्चून बारामतीचा हा प्रकल्प निविदा स्तरापर्यंत येऊन पोहोचला आहे. निविदा निघाल्यानंतर विहीत मुदतीत हे काम पूर्ण होईल व त्या नंतर संबंधित एजन्सीला पाच वर्षांसाठी हा प्रकल्प दुरुस्ती देखभालीसाठी हस्तांतरीत केला जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

cctv watch
Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

बारामती शहर, बारामती तालुका व माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारामती शहराच्या विविध भागात 315 कॅमेरे बसविले जाणार असून या मुळे प्रत्येक ठिकाणच्या हालचालींवर 24 तास कॅमे-यांची नजर असेल. मोटारसायकल चोरी, भांडणे, सोनसाखळी चोरीसह अनेक गुन्हे करणारे गुन्हेगार या कॅमे-यात कैद होणार आहेत. नंबरप्लेट व दुचाकीवरील माणसाचा चेहरा अचूकपणे कैद करणारे कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसणार असल्याने पोलिसांना त्याचा तपासात चांगला फायदा होणार आहे.

cctv watch
Accident News : विजेच्या लोखंडी खांबाला धडक दिल्याने अपघातात युवकाचा मृत्यू ; मध्यरात्री दोन वाजता कुडजे येथे अपघात

महिला किंवा मुलींचे छेडछाड करणारे, वेगाने मोटारसायकल चालविणारे, वाहतूकीच्या नियमांचा भंग करणारे असे अनेक चेहरे कॅमेरा कैद करणार असल्याने पुराव्यासहीत पोलिस गुन्हे दाखल करु शकणार आहेत.

cctv watch
Nashik News : सुधाकर बडगुजरांना अंशत: दिलासा! उपायुक्तांकडून 10 दिवसांची मुदतवाढ

यासाठी बारामती शहर व पंचक्रोशीतील 113 ठिकाणे पोलिसांनी निश्चित केलेली असून प्रकल्पाच्या निविदा निश्चित झाल्यानंतर या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम सुरु होईल. पोलिस स्थानकासह नगरपालिकेतही याचा नियंत्रण कक्ष उभारला जाणार असून पोलिस एका जागेवर बसून वाहतूकीबाबत पब्लिक अँड्रेस सिस्टीमवरुन सूचना करु शकतील.

असे असतील कॅमेरा....

• बुलेट कॅमेरा संख्या 224

• कँटीलिव्हर कॅमेरा संख्या 40

• पीटीझेड कॅमेरा संख्या 56

• एएनपीआर कॅमेरा संख्या 35

• पब्लिक अँड्रेस सिस्टीम 31

• डिजीटल साईन बोर्ड 5

• पीटीझेड व व्हीटीएस कॅमेरा सर्व पोलिसा वाहनांवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.