Ashadhi Ekadashi 2022 : आषाढीच्या उपवासाला महागाईची झळ

साबुदाणा, भगरीच्या भावात वाढ
Ashadi Ekadashi 2022 increase in the price of sabudana bhagari rice pune
Ashadi Ekadashi 2022 increase in the price of sabudana bhagari rice pune sakal
Updated on

पुणे : आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांना माेठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र गेल्या वर्षीच्या शेंगदाणे, साबुदाणा आणि भगरीचे भाव पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्याने यंदाच्या या उपवासालाही महागाईची झळ बसणार आहे.आषाढीनंतर श्रावण, भाद्रपद, गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर उपवासाचे महिने, सण सुरू होतात. त्या पार्श्वभूमीवर बाजारातही यासाठीच्या मालाची माेठी आवक असते. परंतु यंदा आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने भाव वाढले आहेत. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील भाविक मोठ्या प्रमाणात आषाढी एकादशीला उपवास करतात.

त्यामुळे मागणी जास्त असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी आशिष दुगड यांनी सांगितले. छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू या भागातून भगरीसाठी लागणारा कच्चा माल नाशिक येथील मिलमध्ये येतो. तेथून प्रक्रिया झालेली भगर मार्केट यार्डातील भुसार बाजारात दाखल होते, अशी माहिती व्यापारी अशोक लोढा यांनीदिली.

रताळी ८० रुपये किलो

आषाढी एकादशीसाठी प्रामुख्याने करमाळ्यातूनच रताळी आवक होत आहे. शुक्रवारपर्यंत मार्केट यार्डात ४० किलोच्या सुमारे दहा हजार पोत्यांची आवक झाली. किरकोळ बाजारातील विक्रीचा भाव साधारणपणे ६० ते ८० रुपये प्रतिकिलो इतका आहे माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()