Ashadhi Wari 2023 - मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पालखी प्रस्थानानंतर २० टन ८६० किलो कचरा गोळा केला. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सोलापूर व सासवड महामार्गावर हा कचरा गोळा करण्यात आला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीसोहळ्याने बुधवारी (ता. १४) शहरातून ग्रामीण भागात प्रवेश केला. पालखी सोहळ्याने शहराची हद्द ओलांडताच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांर्गत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सोलापूर व सासवड महामार्गाची साफसफाई केली.
त्यामध्ये सहा टन ५३० किलो ओला तर १४ टन ३३० किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. त्यासाठी २८ घंटागाड्यांनी ४९ खेपा घातल्या. पालखीत यावेळी ११३५ सॅनिटरी नॅपकिन्सचेही वाटप करण्यात आले. "पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छतेच्या कामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने काम करता आले.
महिनाभरापासून हे काम सुरू होते. पालखीसोहळा काळात पंच्चावन्न अधिकाऱ्यांसह ८५९ कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुविधा देण्याचे काम केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही. हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन्स वाटपामुळे महिलांना मोठी मदत झाली. सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले संयोजन झाले.'
संजय धनवट, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.