Ashadhi Wari 2023 : 'ज्ञानोबा तुकाराम' जयघोष, टाळ, मृदंगाचा गजरात अश्वांनी नेत्रदीपक तीन प्रदक्षिणा करीत बेलवाडीत रिंगण सोहळा उत्साहात

संत तुकाराम महाराज संस्थान व सणसर ग्रामस्थांच्या वतीने पादुकांची पूजा केली. त्यानंतर, सकाळी सहा वाजता सोहळा बेलवाडीच्या रिंगणासाठी मार्गस्थ झाला.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023sakal
Updated on

Ashadhi Wari 2023 - सकाळच्या आल्हाददायक, चैतन्यमय वातावरण 'पुंडलिक वरदे', 'ज्ञानोबा तुकाराम' जयघोष, टाळ, मृदंगाचा गजरात अश्वांनी नेत्रदीपक तीन प्रदक्षिणा करीत बेलवाडीत रिंगण सोहळा नऊ वाजता पार पडला.

Ashadhi Wari 2023
Pune Crime : गडचिरोलीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या सुशिक्षित तरुणास अटक

संत तुकाराम महाराज संस्थान व सणसर ग्रामस्थांच्या वतीने पादुकांची पूजा केली. त्यानंतर, सकाळी सहा वाजता सोहळा बेलवाडीच्या रिंगणासाठी मार्गस्थ झाला. रिंगणाच्या तळावर पालखीसाठी कायमचा चौथरा, मांडव बांधलेला आहे. रंगरगोटी फुलांच्या माळा, रंगीत कापडाने आरास करीत परिसर सजविला होता. रिंगण आखले होते. त्याच्या बाजूने बांबूचे संरक्षण केले होते.

Ashadhi Wari 2023
Mumbai : कल्याण पूर्व, डोंबिवलीतील नेते केवळ स्टेजवर मिरविणारे,शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख रवी पाटील आपल्याच पदाधिकाऱ्यांवर भडकले

बेलवाडी फाटा येथे वळून गावात सोहळा वळाला. सोहळ्यातील सर्वात पुढे असणारा चौघडा सव्वाआठ वाजता रिंगणस्थळी पोचला. त्यामागे तुकोबांचे अश्व, स्वाराचे अश्व, २७ दिंड्या आतमध्ये घेतल्या. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी पोचला. पालखी रथ आत मध्ये येताच उपस्थित वारकरी व ग्रामस्थांनी ‘बोला पुंडलिक वर दे…’ चा जय घोष झाला.

संस्थांनचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, सोहळाप्रमुख संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल मोरे, बाळासाहेब मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे, सुरेश मोरे, मधुकर मोरे, प्रल्हाद मोरे, पंढरीनाथ मोरे, अभिजित मोरे, विश्वजित मोरे, रामभाऊ मोरे, सूर्यकांत मोरे यांची उपस्थिती होते. त्यांनी रिंगणाची पाहणी केली. तत्पूर्वी चोपदार नामदेव गिराम, देशमुख चोपदार, कानसुरकर चोपदार यांनी रिंगण लावून घेतले.

Ashadhi Wari 2023
Mumbai : कल्याण पूर्व, डोंबिवलीतील नेते केवळ स्टेजवर मिरविणारे,शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख रवी पाटील आपल्याच पदाधिकाऱ्यांवर भडकले

पखवाजाच्या बोलावर टाळकऱ्यानी ठेका धरला. खांद्यावर पालखी घेऊन रिंगणात आले. रिंगणाच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा घातली. मंडपात पालखी मध्यभागी ठेवली. त्यानंतर, मचाले परिवाराच्या मेंढ्यांनी पालखीस प्रदक्षिणा घालून 'श्रीं च्या चरणी सेवा रुजू केली.

पोलीस होमगार्ड आणि सरकारी कर्मचारी यांची एक गोल धाव पूर्ण केली. मेंढ्यांचे रिंगण झाले. पताकाधारी वारकरी, हंडा तुळस घेतलेल्या महिला, विणेकरी यांनी प्रत्येकी तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या.

पवित्र सोवळी । एक तीच भूमंडळी ।।

ज्यांचा आवडता देव । अखंडीत प्रेमभाव ।।

तीच भाग्यवंते । सरती पुरती धनवित्ते ।।

तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ।।

हा संतपर अभंग यावेळी सुरू झाला. त्यानंतर, अश्व रिंगणात आणले.

त्यानंतर पेठ बाभूळकरांचा मानाचा देवाचा अश्व व स्वाराचा मोहिते पाटील यांच्या अश्वाने मनमोहक दौड सुरू केली. अवघ्या ५० सेकंदात तीन फेऱ्या पूर्ण केल्या.

दरम्यान, अश्वांच्या टापूखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. त्यानंतर दोन्ही अश्व पालखीसमोर आले व नतमस्तक झाले. मृदंग व टाळकरी यांच्यात खेळ रंगला. त्याच्या बाजूला पालखीतील व ग्रामस्थ महिलांनी फुगड्या व फेर धरला होता.

त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी ठेवली. दुपारी दोन वाजता सोहळा लासुर्णेकडे मार्गस्थ झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.