Ashadhi Wari 2024 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विश्रांतवाडीत भक्तिमय वातावरणात स्वागत

Ashadhi Wari 2024 : दुपारी अडीचच्या सुमारास पालखीचे विश्रांतवाडीत आगमन झाले. महिलांच्या वतीने रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
Ashadhi Wari 2024 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession  welcomed in Vishrantwadi area
Ashadhi Wari 2024 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession welcomed in Vishrantwadi area

विश्रांतवाडी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात आगमन होताच भाविक भक्तांच्या वतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. रथाचे चाक पंक्चर झाल्याने या वर्षी पालखीचे थोडे उशिरा आगमन झाले. दोनच्या सुमारास म्हस्के वस्ती येथे पालखीचे आगमन झाले. तेथे पुणे महानगपालिकेतर्फे येथे स्वागत करण्यात आले. आयुक्त राजेंद्र भोसले, सहआयुक्त बी.पी. पृथ्वीराज यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी उपआयुक्त माधव जगताप, उपआयुक्त किशोरी शिंदे, सहायक आयुक्त चंद्रसेन नागटिळक आदी अधिकारी उपस्थित होतें.

दुपारी अडीचच्या सुमारास पालखीचे विश्रांतवाडीत आगमन झाले. महिलांच्या वतीने रांगोळी काढण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. यादरम्यान लष्कराच्या वतीने फळांच्ये व पाणीवाटप वारकऱ्यांना करण्यात आले. त्यासाठी करआकारणी केंद्राजवळ स्वागत कक्ष, वैद्यकीय कक्ष, हिरकणी कक्ष व वारकर्‍यांसाठी विसावा कक्ष उभारण्यात आले होते.

स्वराज्य पक्षातर्फे फराळ व फळवाटप आणि छत्री वाटप करण्यात आले. तसेच आरोग्यसेवा देण्यात आली. जितेंद्र जगताप मित्र परिवारातर्फे वारकऱ्यांना खाऊवाटप, राजगिरा लाडूवाटप व पाणीवाटप केले. हजरत हुसैन शाह बाबा लंगर कमिटी व हजरत हुसैन शाह बाबा भटारी संघटनेतर्फे लाडू वाटप करण्यात आले. अध्यक्ष फईम शेख, शब्बीर शेख, रिजवान इनामदार यांनी आयोजन केले.

Ashadhi Wari 2024 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession  welcomed in Vishrantwadi area
Ashadhi Wari 2024 : पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांना पुण्यातील मेट्रोची भुरळ; अनेकांनी लुटला प्रवासाचा आनंद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग क्रमांक २, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्यसेवा, फराळ व पाणीवाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्याप्रा.सुषमा अंधारे, शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, माजी गटनेते संजय भोसले, माजी नगरसेवक सागर माळकर, डॉ.रसिक शेटीया, डॉ.आशा शेटीया, डॉ.सुहास बुलबुलेआदी मान्यवर उपस्थित होते. युवासेना शहर चिटणीस अक्षय सागर माळकर यांनी आयोजन केले.

Ashadhi Wari 2024 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession  welcomed in Vishrantwadi area
Bhushi Dam Lonavala: पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ जण भुशी डॅममध्ये गेले वाहून, २ मृतदेह बाहेर काढण्यात यश

शिवराज मित्र मंडळातर्फे अन्नदान करण्यात आले. याचे शिवाजी काळूराम देवकर यांनी आयोजन केले होते. आप पक्षातर्फे अमित म्हस्के व इतर कार्यकर्त्यांनी फराळवाटप करण्यात आले.

सुरेंद्र पठारे मित्रपरिवारतर्फे नाष्ट्याची सोय केली होती. याचे आयोजन अजहर खान, अतिश रणपिसे, सूरज मौर्या, सुशील रणपिसे, आतिश ढसाळ, राहुल कदम, रोहित धेंडे, रितेश गायकवाड, वैभव पांडे, निलेश गायकवाड, यश घनवट यांनी केले. वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे,भाजपचे जगदीश मुळीक, संतोष खांदवे,सुनील खांदवे,रावसाहेब रागापसरे,अनिल नवले, माजी नगरसेविका रेखा टिंगरे,यांच्यावतीनेदेखील वारकऱ्यांचे परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.येरवडा डॉक्टर्स असोसिएशन, केदारनाथ हॉस्पिटल व चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठानतर्फे फराळवाटप, औषधवाटप व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. काँग्रेसतर्फे पाणीवाटप व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

यादरम्यान विविध पक्ष व संघटनांच्या वतीने विविध उपक्रमासह फळ व पाणीवाटप करण्यात आले. परिसरात खेळणी, झोके व्यावसायिकांनी थाटल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यादरम्यान पुणे शहर पोलिसांच्यावतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतःहून या मार्गाची पाहणी केली. यादरम्यान शहर पोलिसांच्या वतीने सुमारे ३५० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वारकऱ्यांसाठी करण्यात आली होती. तर पालिका साफसफाई विभागाच्या वतीने सफाई कामगार नेमण्यात आले होते. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचं लाभ घेतला. येरवडा,खडकी,संगमवाडी या भागाकडे जाणारे मार्ग पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com