Ashadhi Wari - वारी म्हटले की डोळ्यासमोर येतात, ते लाखो वारकरी आणि त्यातून वाट काढणारा पालखी रथ. पालखीत विराजमान असलेल्या पादुकांना हात लावावा म्हणून तासनतास थांबलेल्या भाविकांचे फुलांनी सजविलेला पालखी रथ लक्ष वेधून घेतो.
दररोज ताज्या फुलांनी हे रथ सजविले जातात. तेही पुण्यातील मार्केटयार्डमधील फुलांनी. पंढरीला निघालेल्या पादुकांच्या रथाच्या सजावटीसाठी विविध फुलांच्या ३०० ते ३५० गुलाब आणि कार्नेशन फुलाच्या गड्ड्यांसह अन्य साधारणतः दोनशे किलो फुले असा एकूण चारशे किलो फुलांचा साज केला जातो.
दरवर्षी आळंदी येथील महाद्वाराला तोरण बांधून आणि माऊलींच्या पादुकांना हार घालून पालखी सोहळ्याला प्रारंभ केला जाते. पालखी आणि रथाच्या सजावटीसाठी दररोज रोज सात ते आठ तास लागतात. पालखी पंढरपूर येथे दाखल होईपर्यंत दररोज सजावट केली जाते. सायंकाळी सहा वाजल्यानंतर सजावटीची तयारी सुरू असल्याची माहिती सजावटकार सुदीप गरुड यांनी दिली.
यामध्ये फुलाची घडी करणे, ग्रील करणे, तोरण करणे, बॉल कट मारण्याची, विविध हार, डिझाईनची कामे करण्यात येतात. काही ठराविक फुले पाण्यात दोन ते तीन तास ठेवली देखील जातात. रथाची आणि पालखीची साइडपट्टी तयार करून घेतली जाते. त्यांनतर रथ सजविण्यास सुरुवात केली जाते. फुलांव्यतिरिक्त सजावटीसाठी स्पंज, सुतळी, जाळी, दोरा आदी साहित्याचा वापर होतो.
विविध प्रकारची फुले...
शेवंती, डच गुलाब, कार्नेशन, नवीन फुलांच्या प्रकारातील सूर्यफूल, झेंडू, गुलछडी, लिली, आष्टर, ऑर्किड, गोंडा, जरबेरा, मोगरा, अबोली यासह उपलब्धतेनुसार विविध प्रकारच्या फुलांचाही वापर केला जातो.
आधीच्या दिवशीची संपूर्ण सजावट काढली जाते
त्यांनतर दुसऱ्या दिवशीच्या सजावटीचे काम सुरू होते
साधारणतः सायंकाळी सहा ते रात्री एकपर्यंत सजावटीचे काम चालते
दररोज वेगवेगळी डिझाईन
सजावट केली जाते
बारा कारागीर दररोज सेवा म्हणून काम करतात.
देशी आणि विदेशी फुलांचा वापर सजावटीसाठी केला जातो.
पालखीच्या सजावटीसाठी पुणे मार्केटयार्डातून फुले नेली जातात. दोन्ही पालख्यांच्या सजावटीसाठी साधारणतः विविध प्रकारची चारशे ते पाचशे किलो फुले लागतात. ६०० ते ७०० गुलाब गड्ड्या लागतात. बाजारातील फुलांच्या उपलब्धतेनुसार विविध व्यापाऱ्यांकडून फुले खरेदी केली जातात.
अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन
रथ आणि पालखीची सर्व सजावट बारा कारागीर सहकाऱ्यांच्या मदतीने दररोज केली जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मिळते. सजावटीसाठी काम करणारे सर्व कारागीर विनामूल्य सेवा करतात.
सुदीप नानासाहेब गरुड, सजावटकार, आळंदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.