पुणे विधानभवनामधे राज्यातील मानाच्या पालखी सोहळाप्रमुखांसोबत शुक्रवारी आषाढी वारीबाबत बैठक आयोजित केली होती.
आळंदी- राज्यभरातील वारकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आषाढी वारीबाबतचा निर्णय आता मुंबईत मंत्रीमंडळाच्या बैठकित सर्वानुमते घेतला जाईल. आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याबाबत एकतर्फी निर्णय न घेतला जाणार नाही. दहा जूनपर्यंत राज्यातील सर्व प्रमुख पालखी सोहळा प्रमुखांना हा निर्णय कळविण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना सांगितले.
पुणे विधानभवनामधे राज्यातील मानाच्या पालखी सोहळाप्रमुखांसोबत शुक्रवारी आषाढी वारीबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागिय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह, सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव बन्सल, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, यांच्यासह आळंदी देवस्थान, देहू देवस्थानसह संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत चांगा वटेश्वर आदी संतांच्या विश्वस्त आणि पालखी सोहळाप्रमुखांची उपस्थीती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यावर कोरोनाचे महासंकट आहे. मागिल वर्षीपेक्षा सध्या कोरोनाची स्थिती भयानक आहे. सध्या रूग्णांची संख्या कमी झाली तरी तिसरा टप्प्यात कोरोनाबाबत अधिक सतर्कता बाळगली जाईल. आषाढी वारीबाबत राज्यभरातील वारकऱ्यांच्या भावनेचा आदर करतो. मुंबईत होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आषाढी पायी वारीचा विषय मांडतो. मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसमोर वारीबाबतचा विषय मांडून चर्चा करून आणि नंतर निर्णय घेतला जाईल. मंत्रीमंडळात झालेला पालखी सोहळ्याबाबतचा निर्णय दहा जूनपर्यंत सर्व देवस्थानानांना कळविला जाईल.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर अभय टिळक म्हणाले,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीवर गडद सावट आहे. आळंदी देवस्थानने पालखी मार्गावरिल पालखी मुक्कामांच्या गावांशी पत्रव्यवहार करून वारीबाबत मते मागवली. यंदाच्या वर्षी आषाढी पायी वारीस तत्वत: परवानगी देण्यात यावी ही एकमुखी मागणी वारकऱ्यांच्यावतीने आहे. पायी वारीस किती लोकांनी जायचे, त्याबाबतचे शासकिय निकष आणि मार्गदर्शक तत्व याबाबत वारकरी आणि शासन एकत्रीत भूमिका ठरवावी. त्याचे पालन वारकऱ्यांकडून केले जाईल.
संत मुक्ताबाई संस्थानचे प्रमुख अॅड रविंद्र पाटील म्हणाले की, ''यंदा आषाढी वारी सोहळ्यासाठी संत मुक्ताबाईची पालखी १४ जूनला सर्वांच्या आधी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्या दृष्ट्रीने शासनाने लवकर निर्णय कळवा.'' श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, ''मागिल वर्षी राज्यातील प्रमुख संतांच्या पालख्या एसटीने परवानगी दिली. मात्र यंदाच्या वर्षी प्रस्थान पूर्वीच निर्णय दिला तर सर्व देवस्थानांना तयारी करता येईल.''
देहू संस्थानचे सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे म्हणाले,''सातशे वर्षांचा सोहळा वारीची परंपरा जतन केली. मागील वर्षी कोरोनाबाबत जागृतता नव्हती. मात्र आता मोजक्या लोकांमधे परवानगी द्यावी. पायी वारीची एकमुखी मागणी केली. गावाच्या बाहेर पटांगणात आम्ही सोय करू. कोरोनाबाबतची सर्व काळजी घेवू.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.