पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या आगमनानिमित्त पुण्यात मंगळवारी (ता. २) ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. विठुरायाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यासह ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी होत जलसंवर्धनाचा जागरही करण्याचा निर्धार शहरवासीयांनी केला आहे.
या उपक्रमाला देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे सहकार्य लाभले आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २) पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्या वेळी सकाळी सात वाजता पुणे कॅम्पमधील महात्मा गांधी बसस्थानकात (पूल गेट) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तेथे भाविकांना ‘जलसंवर्धनाची’ शपथ दिली जाईल. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या आषाढी वारीत ‘साथ चल’ या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांच्या साक्षीने ‘वारी विठुरायाची अन् जलसंवर्धनाची’ या उपक्रमात मंगळवारी पुण्यात जलसंवर्धनाचा हा जागर होणार आहे. या उपक्रमात विविध गणेश मंडळे, मंदिरे, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, ‘तनिष्का’च्या सदस्या यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील.
जलसंवर्धन वारी का?
नद्यांच्या प्रदूषणाबाबत जनजागृती
नदी स्वच्छतेचा सामूहिक संदेश
‘पाणी हेच जीवन’ असा संदेश प्रत्येक भाविकांच्या मनात रुजविणे
कुठे व किती वाजता?
मंगळवार (ता. २) : महात्मा गांधी बसस्थानक, पुलगेट, पुणे कॅम्प : सकाळी ७
संपर्क : पुणे : ओमकार ८१४९१९४७३३,
हृषिकेश ७२७६७४८०७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.