वारकऱ्यांसाठी १ लाख वडापावची सेवा

१०० महिला आणि ७५: स्वयंसेवकांच्या मदतीने २४ तास सेवा
Ashadi wari 2022 Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 1 lakh Vadapav for Warkari katraj pune
Ashadi wari 2022 Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 1 lakh Vadapav for Warkari katraj pune sakal
Updated on

कात्रज : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त लोणंद आणि फलटण येथे १ लाख वडापावचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. गुजर-निंबाळकरवाडी परिसरातील स्व. विठ्ठलदास जगन्नाथ धूत यांनी ४१ वर्षापुर्वी चालू केलेली वारकरी संप्रदायाची सेवा आज त्यांचा तिसर्‍या पिढीने अखंड चालू ठेवली आहे. महेश धूत परिवाराकडूनकडून बरड तालुका फलटण येथे नाश्ट्याला एकूण ५० हजार वारकऱ्यांना १ लाख वडापावचे वाटप करण्यात आले. जेजुरीच्या पुढे वारकर्‍यांच्या खाण्याची पिण्याची सोय पुणे शहराच्या तुलनेत कमी असते.

ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धूत व गजराज इन्फ्रा मित्रपरिवार यांनी आर्यन मंगल कार्यालय येथे केली होती. वडापाव बनविण्यासाठी ३ टन बटाटे, ५०० किलो बेसन, ३० तेलाचे डबे व इतर साहित्याचा वापर करण्यात आला. एकूण १०० महिला आणि ७५ स्वंयसेसेवकांनी २४ तास सेवा देत हा उपक्रम राबविला. वारकर्‍यांनी आवडीने आस्वाद घेतला व मनापासून सर्व सेवकांना आशीर्वाद दिल्याची माहिती यावेळी महेश धूत यांनी दिली. या कार्यात ओमप्रकाश धूत, नंदलाल धूत, प्रसाद बांदल, कानयलाल धूत, सचिन धुत, व्यंकोजी खोपडे, निखिल सुराणा यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.